मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जुई गडकरी. ‘पुढचं पाऊल’ मालिकेतून जुई घराघरात पोहोचली. या मालिकेतील जुईने साकारलेली कल्याणी भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर तिनं काही मालिकांमध्ये काम केलं. तसेच ती छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’मध्येही झळकली. अशी ही मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जुई सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. त्यामुळे जुई देखील या मालिकेसंबंधित नवनवीन गोष्टी सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत आहे.

हेही वाचा – Video: किरण मानेंचा ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “लाडक्या…”

अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवरील गमतीजमती देखील शेअर करत असते. नुकताच तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर मालिकेच्या सेटवरील एका खास मित्राचा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा – “अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले…”; शशांक केतकरवर एका ज्येष्ठ अभिनेत्यानं केली होती टीका, वाचा किस्सा

जुई गडकरीचा हा खास मित्र म्हणजे एक कुत्रा. जुई ही प्राणीप्रेमी असल्याचं हे सर्वांनाच माहित आहे. तिच्याकडे खूप मांजरी आहेत. मालिकेच्या सेटवरही तिचे काही खास प्राणी मित्र झाले आहेत; जे तिच्याबरोबर नेहमी असतात. अशाच एका मित्राची ओळख तिनं चाहत्यांना करून दिली आहे. सेटवरील कुत्र्याचा फोटो पोस्ट करत जुई म्हणाली की, “या बाळाचं नाव बुंगरी आहे. मीच ठेवलंय. मला मेकअप रुम ते सेट आणि सेट ते मेकअप रुम असं सोडायला येतं हे बाळ. मी निघाले की हा निघतो… मी थांबले की हा थांबतो…माझा बुंगरी”

हेही वाचा – “पडले, धडपडले, पुन्हा उठले…” ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली…

तसेच जुईने आणखी एका सेटवरील कुत्र्याची ओळख करून दिली आहे. “हा माझा बुट्टू बाळ. जो नेहमी माझ्याबरोबर प्रवेशद्वारापर्यंत असतो,” असं लिहीत जुईनं दुसऱ्या कुत्र्याचा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा – “आम्ही मुर्ख आहोत, तुम्हाला मतदान करतोय”; ‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम तेजस्विनी लोणारीचं सध्याच्या राजकारणावर परखड मत, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये सध्या सायली आणि अर्जुनचं प्रेम बहरत आहे. अर्जुनला सायलीचा स्वभाव आवडताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात मालिकेत सायली आणि अर्जुनमधील नातं आणखी दृढ होताना पाहायला मिळणार आहे.