scorecardresearch

Premium

Video: ‘ठरलं तर मग’मधील साक्षी आणि समृद्धी केळकरची जबरदस्त जुगलबंदी पाहिलीत का? सिद्धार्थ जाधवही पाहून झाला हैराण

साक्षी आणि समृद्धीच्या जुगलबंदीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

tharla tar mag fame ketki palav and samruddhi kelkar dance video Aata Hou De Dhingana 2
साक्षी आणि समृद्धीच्या जुगलबंदीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ सध्या मराठी मालिकाविश्वावर अधिराज्य गाजवतं आहे. सायली-अर्जुनच्या जोडीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे मालिका सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर टिकून आहे. लवकरच या मालिकेला टक्कर देण्यासाठी ‘आता होऊ दे धिंगाणा २’ प्रव्हेंजर्स येणार आहेत. यादरम्यान ‘ठरलं तर मग’ मालिकेतील साक्षी म्हणजे अभिनेत्री केतकी पालव आणि समृद्धी केळकरमध्ये जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या आठवड्यात ‘आता होऊ दे धिंगाणा २’मध्ये ‘ठरलं तर मग’ मालिका विरुद्ध प्रव्हेंजर्स यांच्यात सांगीतिक लढत होणार आहे. प्रव्हेंजर्समध्ये जुन्या मालिकेतील कलाकार पाहायला मिळणार आहे. यामध्ये ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील सूर्या दादा, पश्या, ‘रंग माझा वेगळा’ मधील दीपा-कार्तिक, ‘ठिपक्यांची रांगोळी’मधील अप्पू, ‘स्वाभिमान’मधील पल्लवी, ‘फुलाला सुगंध मातीचा’मधील कीर्ती यांचा समावेश आहे. हे सर्व कलाकार म्हणजेच प्रव्हेंजर्स ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कलाकारांनी टक्कर देणार आहेत. यादरम्यान साक्षी आणि समृद्धीची जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. ही जुगलबंदी पाहून ‘आता होऊ दे धिंगाणा २’ सूत्रसंचालक सिद्धार्थ जाधवही हैराण झाला आहे. याचा व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

Gautam Adani
हिंडेनबर्गच्या आरोपांची वर्षपूर्ती; अदाणी समूहाचे खुले पत्र, म्हणाले…
Muslim brothers scattered flowers in Lord Rama shobayatra
प्रभू रामाच्या शोभायात्रेत मुस्लीम बांधवांनी केली फुलांची उधळण, हिंदू मुस्लीम ऐक्याचं दर्शन घडवणारा व्हिडीओ होतोय व्हायरल
Ram Lalla’s idol at Ayodhya blinking eyes AI video leaves internet stunned
‘हसरे डोळे अन् लोभस हसू!’ रामलल्लांचे जिवंत रूप पाहून भारावले भक्त; प्रभू रामाच्या मुर्तीचा AI Video Viral
a young man draws shree ram beautiful drawing from The Swastik video goes viral on social media
जवानाने ‘स्वस्तिक’ पासून काढले सुंदर श्रीरामाचे चित्र, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा – Video: अखेर मयुरीचं सत्य राजवीर समोर उघड होणार, ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत रंजक वळण येणार

या व्हिडीओमध्ये, साक्षी आणि समृद्धी ‘फक्त लढ म्हणा’ चित्रपटातील ‘डाव इश्काचा’ या गाण्यावर जबरदस्त नाचताना दिसत आहेत. हाच नाच पाहून सिद्धार्थ जाधवसह सगळे कलाकार त्यांचं कौतुक करताना पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – Video: ‘द आर्चीज’च्या स्क्रीनिंग दरम्यान ऐश्वर्या राय-बच्चनने भाचा अगस्त्यची केली चेष्टा, व्हिडीओ होतोय व्हायरल

‘आता होऊ दे धिंगाणा २’च्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने साक्षी आणि समृद्धीचा नाच पाहून “कडक” अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय ‘राडा’, ‘क्या बात है’, ‘जबरदस्त’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tharla tar mag fame ketki palav and samruddhi kelkar dance video aata hou de dhingana 2 pps

First published on: 06-12-2023 at 18:05 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×