scorecardresearch

Premium

Video: अखेर मयुरीचं सत्य राजवीर समोर उघड होणार, ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत रंजक वळण येणार

अबोल प्रीतीची अजब कहाणी: मयुरीचं सत्य समोर आल्यानंतर राजवीर कोणतं पाऊल उचलणार?

New twist in Abol Priteechi Ajab Kahani Mayuri truth will be revealed in front of Rajveer
फोटो सौजन्य – सोनी मराठी

अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री जान्हवी तांबट यांची प्रमुख भूमिका असलेली ‘अजब प्रीतीची गजब कहाणी’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अजिंक्यने साकारलेला राजवीर आणि जान्हवीने साकारलेली मयुरी आता घराघरात पोहोचली आहे. लवकरच मालिकेला रंजक वळण येणार आहे. राजवीर समोर भाऊसाहेब आणि मयुरी यांचं सत्य उघड होणार आहे.

मयुरीचा एक प्रेमळ मित्र तर भाऊसाहेबचा समजूतदार बॉस राजवीर हा एक सच्चा माणूस आहे. मयुरीकडे आकर्षित होणारा राजवीर आपल्या जवळच्या बॉडीगार्डला म्हणजेच भाऊसाहेबला आपल्या दिलाची कहाणी मित्रत्वाच्या नात्याने सांगत आलेला असतो. मयुरीला राजवीरचं प्रेम कळतंय पण परिस्थितीच अशी आली आहे की मयुरीला राजवीरवरचं प्रेम त्याच्यापासून लपवावं लागतंय. पण नियतीनेच आता मयुरी आणि राजवीर या दोघांना एकत्र आणलंय. आपण राजवीरची फसवणूक करतोय, असं मयुरीला वाटतं असत. त्यामुळे मयुरी आपल्या मैत्रिणीकडे मन मोकळं करत असते. तेव्हाच राजवीर तिला पाहतो आणि सगळं सत्य त्याच्या समोर उघडतं. मयुरी हीच भाऊसाहेब आहे, हे राजवीरला समजतं.

sex change operation indore man
लिंगबदल शस्त्रक्रिया करून मुलाची मुलगी झाला; ४५ लाख खर्च केल्यानंतर प्रियकराकडून लग्नासाठी नकार
letter to a hurt girl friend marathi aricle, mazhi maitrin chaturang marathi article
माझी मैत्रीण : दुखावलेल्या तिला..
siddharth chandekar and sai tamhankar visited koksatta office for sridevi prasanna movie pranmotion zws 70
Sridevi Prasanna Movie Pranmotion : ठरवून केलेल्या लग्नाची गोंधळलेली प्रेमकथा
young man who married a divorced women was attacked by her ex husband
मुंबई : पहिल्या पत्नीशी विवाह करणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

हेही वाचा – Video: ‘द आर्चीज’च्या स्क्रीनिंग दरम्यान ऐश्वर्या राय-बच्चनने भाचा अगस्त्यची केली चेष्टा, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा – सुबोध भावे हिंदी चित्रपटामध्ये का नाही दिसत? अभिनेता कारण सांगत स्पष्टच म्हणाला…

राजवीरने आजवर भाऊसाहेबशी एक मित्र म्हणून बोलताना आपल्या प्रेमाची कबुली आधीच दिली आहे. त्यामुळे मयुरी आपल्याविषयी काय विचार करेल? हा प्रश्न त्याला सतावेल की भाऊसाहेबने उर्फ मयुरीने राजवीरच्या साधेपणाचा फायदा घेतला असा त्याचा समज होईल? या दोघांच्या प्रेमाला लागलेलं हे ग्रहण आता तरी सुटणार का? राजवीर आणि मयुरी एकत्र येतील का? साधा-सरळ-समजूतदार राजवीर अशाही परिस्थितीत शांत चित्ताने विचार करून मयुरीची बाजू समजून घेईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या काळात मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New twist in abol priteechi ajab kahani mayuri truth will be revealed in front of rajveer pps

First published on: 06-12-2023 at 16:48 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×