‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या जोरदार सुरू आहे. अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. टीआरपीचे रेकॉर्ड ब्रेक देखील ‘ठरलं तर मग’ मालिकेने केले आहेत. अशा या लोकप्रिय मालिकेतील एका अभिनेत्रीने ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. याचा किस्सा त्या अभिनेत्री स्वतः सांगितला आहे.

हेही वाचा – “त्यांचे आई-वडील आमच्यासारखे म्हातारे होण्याआधीच वरती…” ऐश्वर्या नारकर यांचं ट्रोलर्सना उत्तर, म्हणाल्या…

‘ठरलं तर मग’ या मालिकेतील प्रत्येक पात्र आता घराघरात पोहोचलं आहे. या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक वर्ग भरभरून प्रेम करत आहेत. त्यापैकी एक म्हणजे प्रिया अर्थात खोटी तन्वी. हे पात्र अभिनेत्री प्रियांका तेंडोलकरने उत्तमरित्या साकारलं आहे. याच प्रिया म्हणजे प्रियांकाने ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. त्याचा किस्सा नुकताच तिने एका मुलाखतीतून सांगितला.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळी इन्स्टाग्रामवर कोणाला फॉलो का करत नाहीत? कारण सांगत म्हणाले, “मी….”

‘स्टार मीडिया मराठी’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलला नुकतीच प्रियांका तेंडोलकर मुलाखत दिली. त्यावेळी तिला तिच्या पहिल्या ऑडिशनविषयी विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, “माझ्या पहिल्या ऑडिशनने मला अजिबात काम मिळून दिलं नव्हतं. मी खूप ऑडिशन दिल्या होत्या. मला पहिल्याच ऑडिशनमध्येच ब्रेक मिळाला असं काही नाही. मी सगळ्यात पहिली ऑडिशन विनोद लव्हेकर सरांकडे दिली होती. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ नावाचा ‘झी मराठी’वर प्रोजेक्ट आला होता, त्यासाठी मी ऑडिशन दिली होती. लव्हेकर सरांनी खूप छान ऑडिशन घेतली होती. मला अजूनही आठवतंय, त्यांनी इम्प्रोवाइज करून घेतलं होतं. तो दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. तेव्हा मी आतापेक्षा अभिनयाबाबतीत थोडी कमी होते. प्रत्येक कामाने मी घडतं गेले आणि आता मी जे काम करतेय त्या सगळ्याच श्रेय आधीच्या सगळ्या ऑडिशनचं आहे.”

हेही वाचा – अभिनेते मकरंद अनासपुरे यांना दहावीत किती टक्के मिळाले होते? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रियांका तेंडोलकरने ‘ठरलं तर मग’ मालिकेपूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘फुलपाखरू’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’, ‘साथ दे तू मला’ या मालिकांमध्ये ती झळकली आहे.