ठरलं तर मग ही स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रिया पूर्णाआजीला सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगते. त्यामुळे पूर्णाआजी सायलीला देवासमोर शपथ घ्यायला लावते; पण सायलीही निर्भीडपणे तिचं अर्जुनवर असणारं प्रेम शपथ घेऊन व्यक्त करते. त्यामुळे प्रिया अडचणीत सापडते आणि तिचा डाव तिच्यावरच उलटतो.

एकीकडे सायलीनं तिचं प्रेम सुभेदार कुटुंबासमोर जाहीर केल्यानं अर्जुन खूश होतो; पण सायलीलाही मनोमन याचा आनंदच होत असतो. आता लवकरच दोघंही एकत्र येणार आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे कबूल करणार, असं वाटत असतानाच, सायली व अर्जुन यांच्यामध्ये दुरावा निर्माण होणार असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा… ठरलं तर मग: …अन् अर्जुन चैतन्यच्या कानाखाली मारतो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य साक्षीला सांगितल्यामुळे अर्जुनचा राग अनावर, पाहा प्रोमो

नवीन आलेल्या प्रोमोमध्ये शनिवारच्या (११ मे) भागात आश्रमापासून मैत्रिणी असलेल्या सायली व कुसुम खूप दिवसांनंतर भेटतात. सायलीचं अर्जुनवर प्रेम आहे; पण अर्जुनचं तिच्यावर प्रेम नाही, असं गैरसमजातून सायलीला वाटतं. त्यामुळे इतके दिवस आपल्या मनात साठवून ठेवलेल्या भावना ती कुसुमला सांगते. हे सांगत असताना सायलीचे अश्रू अनावर होतात. सायली कुसुमला म्हणते, “माझ्याही नकळत मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले; पण सरांच्या मनात माझ्याविषयी काहीही नाही.”

हेही वाचा… गुड न्यूज दिल्यानंतर पहिल्यांदाच दिसला दीपिका पदुकोणचा बेबी बंप; अभिनेत्रीचा अनसीन फोटो व्हायरल

एकीकडे या गैरसमजामुळे सायलीच्या भावना दुखावल्या जातात; तर दुसरीकडे अर्जुन त्याच्या कारमध्ये बसून सायलीचा मोबाईलमधे फोटो पाहत असतो. त्याच्याही डोळ्यांतून अश्रू वाहत असतात. अर्जुन म्हणतो, “मला तुम्हाला घेऊन माझी बायको म्हणून मिरवायचं होतं; पण तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीही नाही, हे माझ्या आधीच लक्षात यायला पाहिजे होतं.” स्वतःची समजूत घालत असताना अर्जुन दुखावलेला असतो.

अर्जुन व सायली यांचं एकमेकांवर प्रेम असूनही दोघंही ते लपवतायत; परंतु त्यामुळे दोघांच्या मनात एकमेकांबद्दल खूप मोठे गैरसमज निर्माण झाले आहेत. या दोघांमधील हे गैरसमज दूर होतील का? अर्जुन व सायलीला एकमेकांच्या मनातल्या भावना कळणारच नाहीत का? दोघंही एकमेकांसमोर आपलं प्रेम कबूल करतील की आयुष्यभरासाठी वेगळे होतील? असे प्रश्न आता चाहत्यांना पडू लागलेत.

हेही वाचा… “…तुम्ही हुमा कुरेशीच्या पाया पडत होता”, कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्याची कमेंट; अभिनेता म्हणाला, “मला भरून आलं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नव्या प्रोमोच्या व्हिडीओवर चाहते नाराजी व्यक्त करताना दिसतायत. अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एकानं कमेंट करीत लिहिलं, “आता हे काय?” तर, दुसऱ्यानं “बावळटपणा”, अशी कमेंट केली. “फालतूगिरी दाखवली आहे,” असं एक जण म्हणाला.