‘ठरलं तर मग’ मालिकेने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांची मनं जिंकली. दीड वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेचा चाहतावर्ग मोठा असल्यानं टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका आपलं अव्वल स्थान गाठून आहे. या मालिकेतील सायली-अर्जुनची जोडी लोकप्रिय झाली असून, दर दिवशी मालिकेत काय घडणार याची प्रेक्षकांना उत्कंठा लागलेली असते.

सध्या मालिकेत काय घडतंय

‘ठरंल तर मग’ मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. या मालिकेत सध्या प्रतिमाच्या मृत्यूचा सीक्वेन्स सुरू आहे. प्रिया आणि नागराजचा प्लॅन यशस्वी होतो आणि रविराजला विश्वास बसतो की, प्रतिमा या जगात नाहीय. त्यामुळे रविराज आणि सुभेदार कुटुंब अत्यंत दु:खात असतं. प्रतिमावर अंत्यसंस्कार केल्यानंतर रविराज तिच्या फोटोला हार घालणार इतक्यात सायली प्रतिमाची साडी नेसून येते आणि पूर्णाआजीला सायलीमध्ये प्रतिमाचा भास होतो. पूर्णाआजी सायलीकडे पाहून म्हणते, “हिच्या रूपात मला माझी प्रतिमा जिवंत असल्याचा भास होतोय. तो हार फोटोला नको घालू या.” हे ऐकताच प्रियाला धक्का बसतो.

हेही वाचा… “जाड किंवा बारीक…”, ट्रोल झालेल्या महिलांसाठी सोनाली कुलकर्णीने दिला मोलाचा सल्ला, म्हणाली…

नुकताच मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय. या प्रोमोमध्ये प्रतिमाच्या मृत्यूची बातमी कळल्यामुळे सुभेदार कुटुंब आणि रविराजला मोठा धक्का बसलेला असतो. त्यामुळे रविराज त्याचं अन्न-पाणी सोडतो. या सगळ्या परिस्थितीत सायली त्याला सांभाळून घेते. “अन्नावर ना राग काढायचा असतो ना दु:ख. तुम्ही अशी अन्नाची हेळसांड केलीत, तर प्रतिमा आत्याला ते आवडणार नाही. थोडंसं तरी खाऊन घ्या सर”, असं म्हणून सायली रविराजला घास भरवते.

हेही वाचा… ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम ईशा केसकरने ‘पुष्पा-२’ च्या गाण्यात आणला ट्विस्ट, डान्स व्हिडीओ व्हायरल

नकळत सायलीकडून तिच्या खऱ्या बाबांसाठीची काळजी व्यक्त होते. हे बाप-लेकीच्या नात्याचं सत्य कधी उलगडणार याची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. पूर्णाआजीच्या सांगण्यावरून प्रतिमा जिवंत असल्याचा विश्वास सगळ्यांना बसेल का? की प्रिया आणि नागराजचा हा प्लॅन यशस्वी होईल हे येत्या भागांमध्ये स्पष्ट होईल.

हेही वाचा… …अन् वरुण धवनने खेचून घेतला पापाराझीचा फोन; अभिनेत्याचा VIDEO व्हायरल होताच नेटकरी म्हणाले…

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ या मालिकेत जुई गडकरी आणि अमित भनुशाली प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर प्रियांका तेंडोलकर, ज्योती चांदेकर, प्राजक्ता दिघे, चैतन्य सरदेशपांडे, केतकी पालव या कलाकारांच्या निर्णायक भूमिका यात आहेत.