‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षकांचा अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट लग्न, मालिकेत येणारे ट्विस्ट यामुळे गेले कित्येक महिने ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या गणेश उत्सव विसर्जनाच्या भागात सायलीवर महिपत आणि नागराज यांच्या गुंडांनी हल्ला केल्याचं दाखवण्यात आलं. आता आगामी भागात मालिकेच्या कथानकात काय ट्विस्ट येणार हे जाणून घेऊया…

हेही वाचा : “‘सत्याची’ ताकद व्हती”, किरण मानेंची गांधी जयंतीनिमित्त पोस्ट; म्हणाले, “यांच्या हजार पिढ्या…”

‘ठरलं तर मग’ मालिकेचा नवा प्रोमो अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मालिकेच्या गेल्या काही भागांमध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सायलीवर महिपत आणि नागराजने पाठवलेले गुंड चाकूहल्ला करतात. तेव्हा सायली जोरात अर्जुनला हाक मारते. पोटावर वार केल्याने ती बेशुद्ध होऊन खाली पडते. सायलीवर पुढचा वार होण्याच्या आधी अर्जुन तेथे पोहोचतो आणि सायलीला सावरतो. पुढे अर्जुन तिला अस्वस्थ होऊन रुग्णालयात दाखल करतो असं दाखवण्यात आलं आहे. यादरम्यान, सायली-अर्जुनला संपर्क करण्याचा घरातील सगळे लोक प्रयत्न करत असतात. शेवटी अर्जुन चैतन्यचा फोन उचलतो आणि घडलेली संपूर्ण परिस्थिती त्याला सांगतो.

हेही वाचा : “शाळेत उंचीमुळे मला…”, ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “आज तुमच्यासमोर सुवर्णपदक…”

अर्जुनने सायलीवर हल्ला झाल्याचं सांगितल्यावर कल्पना, प्रिया, रविराज आणि चैतन्य रुग्णालयात पोहोचतात. डॉक्टर सायलीची प्रकृती अतिशय गंभीर असून तिला तातडीने रक्ताची गरज असल्याचं अर्जुनला सांगतात. सायलीच ब्लडग्रुप ओ निगेटिव्ह असल्याने तिला कुठेच रक्त मिळत नाही. अशा परिस्थितीत रविराज किल्लेदार ( सायली म्हणजेच तन्वीचे खरे बाबा) या कठीण प्रसंगातून सायली नक्की वाचणार असं म्हणतात. रविराज सायलीची बाजू घेत असल्याचं पाहून प्रिया आश्चर्य व्यक्त करते असं आगामी प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे.

हेही वाचा : “आदल्या दिवशीचा चिकनचा रस्सा, शिळी भाकरी अन्…” दुबईत फिरणाऱ्या मराठी अभिनेत्याला येतेय मराठमोळ्या खाद्यपदार्थांची आठवण, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायली हिच खरी तन्वी असल्याचं सत्य अद्याप मालिकेत कोणालाच माहिती नाही. तन्वी ही रविराज-प्रतिमाची मुलगी असते. त्यामुळे सायली आणि रविराज किल्लेदार यांचं रक्तगट एकच असण्याची दाट शक्यता आहे. रविराज सायलीला रक्त देणार का? त्यांचा रक्तगट एकच असेल का? अर्जुन सायलीचा जीव कसा वाचवणार? हे प्रेक्षकांना येत्या काही भागांत पाहायला मिळणार आहे.