दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं नाव मराठी सिनेसृष्टीत अत्यंत अदबीनं घेतलं जात. २०१६ साली पुण्यातील भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरु असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झालं. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी सिनेसृष्टी हादरली होती. पण अश्विनी एकबोटे यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे. लवकरच त्यांचा मुलगा शुभंकर एकबोटे लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच त्याचा व्याही भोजनाचा कार्यक्रम पार पडला.

अश्विनी एकबोटे यांचा मुलगा शुभंकर आईच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. शुभंकर ‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कन्यादान’ मधील त्यांची ऑनस्क्रीन बायको वृंदा म्हणजे अभिनेत्री अमृता बनेबरोबर खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शुभंकर व अमृताचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात झाला होता. या साखरपुड्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

हेही वाचा – २४ वर्षांच्या प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरने अक्षय कुमारचा फ्लॅट खरेदी केल्यानंतर घेतली आलिशान गाडी, फोटो शेअर करत म्हणाली…

साखरपुड्याच्या चार महिन्यांनंतर ६ एप्रिलला शुभंकर व अमृताचा व्याही भोजनाचा कार्यक्रम पार पडला. याचे फोटो समोर आले आहेत. दोघांच्या कुटुंब व जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा व्याही भोजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शुभंकरची होणारी बायको अमृता निळ्या रंगाच्या साडीत खूप छान दिसत होती. तसेच डोक्यावर टोपी व कुर्ता या लूकमध्ये शुभंकर देखील छान दिसत होता.

हेही वाचा – स्पिरिट ऑफ एक्स्टसी सोन्याचं अन्…; नीता अंबानींनी खरेदी केली आलिशान गाडी, जाणून घ्या किंमत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शुभंकर व अमृताच्या लग्नाच्या तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे. पण दोघं लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे.