Marathi Actor New Home : दगडू-प्राजूची लव्हस्टोरी सांगणारा ‘टाईमपास’ सिनेमा २०१४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. यामध्ये अभिनेत्री केतकी माटेगावकर आणि अभिनेता प्रथमेश परब यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमातील प्रत्येक कलाकाराची भूमिका घराघरांत लोकप्रिय झाली होती.

‘टाईमपास’मध्ये दगडूच्या ( प्रथमेश परब ) जिगरी मित्राची म्हणजेच मलेरिया दादूसची भूमिका अभिनेता जयेश चव्हाणने साकारली होती. त्याची ही भूमिका बरीच गाजली होती. आता जयेश पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याने नुकतंच नवीन घर घेतलं आहे.

जयेशने पनवेलपासून जवळ असलेल्या कोणार्क रिव्हर सिटी परिसरात नवीन घर घेतलं आहे. ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने सर्वांना सांगितली आहे. जयेशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गृहप्रवेशाच्या पूजेची झलक पाहायला मिळत आहे.

जयेश म्हणतो, “ही वास्तू नाही…आमच्या स्वप्नांचा पहिला Take आहे” यापुढे अभिनेत्याने “ड्रीम होम, नवीन घर” असे हॅशटॅग दिले आहेत. जयेशच्या नव्या घराच्या नेमप्लेटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

जयेशच्या नव्या घराची नेमप्लेट क्लॅप बोर्डसारखी आहे. यावर अभिनेत्याचं नाव, रूम नंबर आणि त्याच्या स्टुडिओचं नाव लिहिल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या घरातील मुख्य प्रवेशद्वार, प्रशस्त हॉल, किचन याची झलक पाहायला मिळतेय.

दरम्यान, जयेश चव्हाणने शेअर केलेल्या नव्या घराच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “सुखाचं नवीन ठिकाण आणि आनंदाचा नवा अध्याय”, “जयेश अभिनंदन”, “नव्या घरासाठी खूप खूप शुभेच्छा” अशा कमेंट्स करत चाहत्यांनी जयेशचं अभिनंदन केलं आहे.