Titeeksha Tawde And Siddharth Bodke Wedding :’सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत तितीक्षा तावडेने ‘नेत्रा’ ही प्रमुख भूमिका साकारली असून तिच्या ‘रुपाली’ या ऑनस्क्रीन सासूबाईंची भूमिका ऐश्वर्या नारकर यांनी निभावली आहे. वैयक्तिक आयुष्यात तितीक्षा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

ऑनस्क्रीन जरी नेत्रा आणि रुपाली एकमेकींच्या विरोधात असल्या तरी खऱ्या आयुष्यात मात्र, तितीक्षा आणि ऐश्वर्या यांच्यात खूप सुंदर असं बॉण्डिंग आहे. दोघीही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. तितीक्षाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या दिवशी म्हणजेच तिच्या लग्नाला ऐश्वर्या नारकर खास उपस्थिती लावणार आहेत.

हेही वाचा : Video : आकर्षक सजावट, हटके लूक अन्…; तितीक्षा-सिद्धार्थच्या हळदीचा खास व्हिडीओ; अभिनेता म्हणाला, “उष्टी हळद…”

गेल्या काही दिवसांपासून तितीक्षा व सिद्धार्थ बोडके यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा चालू आहे. परंतु, दोघांनीही लग्नाची तारीख अद्याप जाहीर केली नव्हती. मात्र, ऐश्वर्या नारकर यांनी नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमुळे ही लोकप्रिय जोडी आज ( २६ फेब्रुवारी ) विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा : मेहंदी रंगली गं! पूजा सावंतच्या हातावर सजली सिद्धेशच्या नावाची मेहंदी, फोटो व्हायरल

ऐश्वर्या नारकर यांच्यासह या व्हिडीओमध्ये अभिनेत्री सुरुची अडाकर देखील आहे. “आम्ही आमच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी उत्सुक आहोत. तितीक्षा आणि सिद्धार्थसाठी महत्त्वाचा दिवस” असं कॅप्शन ऐश्वर्या यांनी या व्हिडीओला दिलं आहे. तसेच या व्हिडीओवर २६ फेब्रुवारी २०२३ अशी तारीख देखील नमूद केल्याचं पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऐश्वर्या नारकर, सुरुची यांच्यासह रसिका सुनील, अनघा अतुल, गौरी नलावडे, खुशबू तावडे, संग्राम साळवी असे मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कलाकार तितीक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाला खास उपस्थिती लावणार आहे.