छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम बबीता म्हणजे मुनमुन दत्ता परदेशात फिरायला गेली होती. गेल्या काही दिवसांपासून ती हाँगकाँग, स्वित्झर्लंडमधील फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर करत होती. याच परदेशवारीदरम्यान मुनमुनचा अपघात झाला होता. अभिनेत्रीने स्वतः पोस्ट शेअर करून तिच्या अपघाताची माहिती दिली होती. आता तिची प्रकृती सुधारत आहे तिने फोटो शेअर करत माहिती दिली आहे.
मुनमुन दत्ताने २१ नोव्हेंबर रोजी इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून अपघाताविषयी माहिती दिली मुनमुनच्या गुडघ्याला लागलं होतं दुखापतीमुळे तिलाप्रवास कमी करावा लागला होता. आता तिने पुन्हा एकदा पोस्ट शेअर केली आहे, ज्यात ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे तिने लिहले आहे की, “माझ्या गुडघ्याच्या अपघातानंतर माझ्या फिटनेसमध्ये हळूहळू प्रगती होत आहे. पुन्हा पाहिल्यासारख फिट होण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. अजूनही वेदना होत आहेत. परंतु मी अतिरिक्त वजन कमी कमी करून पुन्हा तंदुरुस्त आणि निरोगी होण्यास उत्सुक आहे असे तिने लिहले आहे.
‘सरला एक कोटी’ चित्रपटातील अनुभवावर ओंकार भोजनेची प्रतिक्रिया; म्हणाला, “माझे मित्र ईशाबद्दल….”
दरम्यान, मुनमुन दत्ता स्वित्झर्लंडमधील फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत होती. या फोटोंमध्ये मुनमुन दत्ता खूप खुश दिसत होती. पण दुर्दैवाने तिचा अपघात झाला आणि आता तिला प्रवास अर्धवट सोडून घरी परतावे लागले होते.
-
moon moon
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मुनमुनने आपल्या करियरची सुरवात मॉडेलिंग क्षेत्रापासून केली आहे. ‘हम सब बाराती है’ या चित्रपटाद्वारे तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतून ती घराघरात पोहचली. या मालिकेत ती अनेकवर्ष काम करत आहे.