Tu He Re Maza Mitwa upcoming twist: मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांना कायमच खिळवून ठेवतात. मालिकेतील आपल्या आवडणाऱ्या पात्रांबरोबर पुढे काय घडणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. कारण- दररोज टेलिव्हिजनवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनाचा महत्वाचा भाग बनतात.

स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका लोकप्रिय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच अर्णव व ईश्वरीचे लग्न झाले आहे. या लग्नामुळे ईश्वरी आनंदी नाही. तिचा अर्णववर राग आहे.

अर्णवने तिच्या वडिलांचा अपघात घडवून आणला असे तिला वाटत आहे. पण, हा अपघात राकेशने घडवून आणला. पण गाडी अर्णवची वापरली. त्यामुळे ईश्वरीचा मोठा गैरसमज झाला आहे. आता तिच्यासमोर आणखी मोठे सत्य येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

‘तू ही रे माझा मितवा’मध्ये ट्विस्ट

स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर तू ही रे माझा मितवाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की ईश्वरी देवीसमोर उभी आहे. ती म्हणते, “मी नऊ दिवस नियमितपणे तुझी पूजा केली. आई भवानी, तुझ्या आशीर्वादाचा प्रकाश राहो. संकट कुठले घरादारावर कधी न येवो.”

तितक्यात एक मनुष्य त्यांच्या घरी येतो. तो व्यक्ती राकेश असतो. तो ईश्वरीला दिसतो. ती त्याच्याकडे बघत असते. तितक्यात अर्णवची बहीण त्याला जाऊन मीठी मारते. तर आत्या त्याला जावईबापू तुम्ही? असे म्हणते. तर अर्णवची बहीण त्याला विचारते आज अचानक कसे काय असे विचारते? त्यावर राकेश तिला म्हणतो की राणीसरकार सरप्राइज द्यायला आलो आहे. ईश्वरी मनातल्या मनात म्हणते म्हणजे राकेशजीच राजेश आहेत.

नेटकरी काय म्हणाले?

हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने राकेशचं सत्य ईश्वरीसमोर येणार, असे लिहिले आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. “अखेर तो क्षण आला”, “आता तिचा राग कमी होईल”, “हा एपिसोड पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे”, “आता मजा येईल”, “मला वाटतं की तो मुद्दाम आला आहे. अर्णव ईश्वरीला त्रास देण्यासाठी तो आला आहे”, “अखेर. मी कधीपासून या क्षणाची वाट बघत होतो”, अशा काही कमेंट पाहायला मिळत आहे.

आता राकेशचे सत्य समोर आल्यानंतर ईश्वरी काय करणार, मालिकेत पुढे काय होणार, अर्णवबद्दल तिचा राग कमी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.