दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रत्येकजण काहींना काही तरी खरेदी करत असतात. मग ते घर असो किंवा आलिशान गाडी. नुकतंच, ३ नोव्हेंबरला ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री रुपाली भोसलेने दिवाळीचं औचित्य साधून आलिशान गाडी खरेदी केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रुपालीनंतर आणखी एका अभिनेत्याने आलिशान गाडी खरेदी केल्याचं समोर आलं आहे. या अभिनेत्याने आपल्या नव्या आलिशान गाडीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये बरकतच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता अमोल नाईकने आलिशान गाडी खरेदी केली आहे. आपल्या कुटुंबाबरोबर त्याने हा आनंदाचा क्षण साजरा केला आहे. टाटा मोटोर्सची गाडी अमोल नाईकने खरेदी केली आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: वाइल्ड कार्ड सदस्यांमुळे ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण तापलं, कशिश कपूरने ‘या’ सदस्याला केलं टार्गेट, म्हणाली…

गाडीचे फोटो शेअर करत अमोल नाईकने लिहिलं आहे, “श्री स्वामी समर्थ…स्वामींच्या आशीर्वादाने पाडव्याचा मुहूर्त साधून नाईक परिवारामध्ये हे नवीन सदस्य आले. त्यांचं माझ्याकडून आणि तुम्हा सर्वांकडून मी मनापासून स्वागत करतो…बाकी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद, प्रेम माझ्यावर आता आहे त्यापेक्षा जास्त वाढतचं राहूदे…श्री स्वामी समर्थ…आमच्या घरी नव्या सदस्याचं स्वागत आहे.”

हेही वाचा – Video: ‘जवान’नंतर अ‍ॅटलीच्या ‘बेबी जॉन’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, वरुण धवनच्या अ‍ॅक्शनने अन् जॅकी श्रॉफ यांच्या लूकने वेधलं लक्ष

हेही वाचा – Video: “तुमचा वारसा ही पुढे चालवणार”, विशाखा सुभेदारचा भाचीबरोबरचा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अमोल नाईकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्याने ‘तुझ्यात जीव रंगला’नंतर ‘झी मराठी’च्या ‘दार उघडं बये’ मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत त्याने सुन्याची भूमिका साकारली होती. याशिवाय अमोल ‘सन मराठी’च्या ‘सुंदरी’ मालिकेत झळकला होता. या मालिकेत अमोल विजूच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. तसंच ‘संत गजानन शेगावीचे’ मालिकेत देखील अमोलने काम केलं होतं. सध्या तो ‘स्टार प्लस’वरील ‘माटी से बंधी डोर’ मालिकेत दिसत आहे.