Tula Shikvin Changalach Dhada New Promo : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या चारुलताने अक्षराची रवानगी मानसिक रुग्णालयात केल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अक्षरा-अधिपती हनिमूनला गेल्यावर चारुहास भुवनेश्वरीला घराबाहेर काढतो. परिणामी, अधिपती प्रचंड अस्वस्थ असतो. सर्वत्र भुवनेश्वरीची शोधाशोध सुरू असताना अचानक एके दिवशी बाजारात अक्षराला अधिपतीची खरी आई चारुलता दिसते.

अक्षरा आपल्या खऱ्या सासूला मोठ्या आदर-सन्मानाने घरात परत आणते. घरात येताच चारुलता सुनेशी चांगलं वागून तिचं कौतुक करते. पण, अधिपती काही केल्या चारुलताचा स्वत:ची आई म्हणून स्वीकार करत नाही. गेल्या काही दिवसांपासून अक्षराला चारुलताचं वागणं काहीसं खटकत असतं आणि चारुलता हीच खरी भुवनेश्वरी असल्याचा संशय तिच्या मनात निर्माण होतो.

हेही वाचा : “एका काकूंनी त्यांच्या मुलीची ओळख करून दिली अन्…”; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखने सांगितला किस्सा, म्हणाला, “हा यश…”

अक्षराला कामानिमित्त घराबाहेर पडल्यावर भुवनेश्वरीची झलक दिसते. यावेळी तिला भुवनेश्वरीचं पाठमोरं रुप दिसतं, ती त्या बाईंच्या मागे जाण्याचा प्रयत्न करते पण, तेवढ्यात ती नाहिशी होती. अक्षरा हताश होऊन घरात परत येते आणि चारुलताच्या कानात भुवनेश्वरीसारख्या सेम टू सेम कुड्या ( कानातले ) पाहते. यानंतर चारुलताच खरी भुवनेश्वरी आहे यावर अक्षराचा विश्वास बसतो.

अक्षरा तिचं म्हणणं घरातल्या सर्वांसमोर सांगते. पण, कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. चारुलता सगळ्या सूर्यवंशी कुटुंबीयांसमोर तिला खोटं सिद्ध करते आणि सुनेची रवानगी मेंटल हॉस्पिटलमध्ये करते. आता येणाऱ्या भागात सुनेला वेडं ठरवण्यात चारुलताला यश मिळणार असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण, अधिपती चारुलताचा आई म्हणून स्वीकार करण्याच्या मार्गावर आहे.

हेही वाचा : Video : “लातूर शहराचा एकच Bigg Boss…”, मोठ्या भावाच्या प्रचारासाठी रितेश देशमुख मैदानात; म्हणाला, “अमित भैया…”

रुग्णालयात भेट घेण्यासाठी आलेल्या आपल्या नवऱ्याला अक्षरा पॅनिक होऊन काही गोष्टी सांगत असते. मास्तरीण बाई म्हणते, “तुम्ही वेळीच जागे व्हा! तुमच्या डोळ्यात धूळ फेकली जातेय. हे सगळं खूप भयंकर आहे.. तुम्ही जागे व्हा…” अधिपती यावेळी आपल्या बायकोला जवळ घेत तिला धीर देत असतो. एवढ्यात रुग्णालयात चारुलता येते, ती म्हणते, “काय होतंय बाळा तुला? अधिपती का एवढी व्हायलंट झालीये ती?” यावर अधिपती पटकन “काही झालं नाही आईसाहेब” असं उत्तर देतो. या उत्तरामुळे अक्षराला प्रचंड धक्का बसतो. अधिपतीने अचानक चारुलताचा आई म्हणून स्वीकार केल्याने ती एकटक नवऱ्याकडे बघतच राहते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या घडणाऱ्या घडामोडींवरून चारुलताच भुवनेश्वरी असून तिचा अक्षराला वेडं ठरवण्याचा प्लॅन आता यशस्वी होत असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी बांधला आहे. आता अक्षरा या महाजाळातून कशी बाहेर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.