Tula Shikvin Changalach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत काही महिन्यांपूर्वी चारुलताची एन्ट्री झाली. अक्षरा-अधिपती हनिमूनला गेलेले असताना चारुहास भुवनेश्वरीला घराबाहेर काढतो. घरी पुन्हा आल्यावर अधिपतीला त्याची आई कुठेच दिसत नाही. त्यामुळे तो प्रचंड बैचेन होतो. सगळेजण भुवनेश्वरीचा शोध घेऊ लागतात. अशातच बाजारात एकेदिवशी अक्षराला चारुलता ( अधिपतीची खरी आई ) दिसते.

चारुलता ही अधिपतीची खरी आई असते. ती भुवनेश्वरीपेक्षा पूर्णपणे वेगळी, सुशिक्षित आणि सुनेला समजून घेणारी अशी असते. त्यामुळे अक्षरा तिची मनधरणी करून चारुलताला पुन्हा एकदा सूर्यवंशींच्या घरात घेऊन येते. अधिपती काही केल्या चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारत नाही. भवुनेश्वरीचा शोध घेणं तो सुरु ठेवतो. यादरम्यान दुर्गेश्वरी आणि चंचला यांची कट-कारस्थानं मालिकेत ( Tula Shikvin Changalach Dhada ) सुरूच होती. मात्र, नुकत्याच एका भागात चारुलता दुर्गेश्वरीने चूक करूनही तिला माफ करते, असं दाखवण्यात आलं. यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो.

हेही वाचा : “आम्हाला वेड्यात काढू नका”, जब्या-शालूचा लग्नाचा फोटो पाहून नेटकरी संभ्रमात; अनेकांनी केलं ट्रोल

भुवनेश्वरी पुन्हा येणार

अक्षराला सुद्धा चारुलताच्या वागण्याबाबत शंका येते. ती अधिपतीला सांगते, “आईंनी मावशींना एवढ्या सहज माफ केलं, मला त्यांच्या माफ करण्यात सहजता जाणवली. आईंना मावशींबरोबर काहीतरी जवळीक जाणवली असणार” हळुहळू घरात वावरणारी व्यक्ती कोण आहे? भुवनेश्वरी की चारुलता… याबद्दल अक्षराच्या मनात संभ्रम निर्माण होत असतानाच आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

बाजारात गेलेल्या अक्षराला अचानक भुवनेश्वरीची झलक दिसते. नऊवारी साडी, अंगावर शाल, केसात गजरा, साडीवर शोभतील असे भरजरी दागिने, हातात सोन्याच्या अंगठ्या असा सासूचा पाठमोरा लूक अक्षराला दिसतो. यामुळे तिचा प्रचंड गोंधळ उडतो. या प्रोमोमुळे आता पुन्हा एकदा मालिकेत ( Tula Shikvin Changalach Dhada ) भुवनेश्वरी दिसणार असल्याचं निश्चित झालं आहे.

हेही वाचा : Video : दिवाळीच्या दिवशी जान्हवी किल्लेकरने सासूबाईंसाठी केलं असं काही…; नेटकरी म्हणाले, “खरी लक्ष्मी तुच आहेस…”

हेही वाचा : Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : ‘सिंघम अगेन’ने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ( Tula Shikvin Changalach Dhada ) मालिकेत भुवनेश्वरीची एन्ट्री ६ नोव्हेंबरच्या भागात होणार आहे. आता अक्षरा तिची भेट घेण्यात यशस्वी होणार की, नजरचूक होऊन सासूबाई सुनेच्या डोळ्यासमोरून नाहीशा होणार हे आपल्याला या भागातच पाहायला मिळेल.