संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ वेब सीरिजची क्रेझ अजूनही कायम आहे. वेबी सीरिज प्रमाणेच गाणी सुपरहिट झाली आहेत. सोशल मीडियावर तर ‘हीरामंडी’तील गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक जण या वेब सीरिजमधील गाण्यावर जबरदस्त नृत्य करताना दिसत आहेत. कलाकार मंडळी देखील ‘हीरामंडी’ सीरिजमधील गाण्यावर आपलं नृत्य कौशल दाखवत आहेत.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी केलं फोटोशूट, म्हणाली, “बालपणीचा…”

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या मास्तरीण बाई अर्थात अभिनेत्री शिवानी रांगोळेने ‘हीरामंडी’तील गाण्यावर कथ्थक नृत्य केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिनं लिहिलं आहे, “‘हीरामंडी’ फिव्हर, ट्रेंड फॉलो करायला थोडा उशीर झाला पण कधीही न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलं हे महत्त्वाचं आहे. मी युट्यूबवर MAD Feet Dance Crewचा व्हिडीओ पाहिला. त्यानंतर मी त्यांचं पाहून सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. खूप सोपं आणि सुंदर नृत्य होतं. यामुळे मला आवडणारं कथ्थक नृत्य पुन्हा एकदा करण्यासाठी मदत झाली.”

हेही वाचा – Video: ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाच्या परीक्षणाची धुरा संकर्षण कऱ्हाडे व अमृता खानविलकरच्या हाती, सूत्रसंचालन करणार ‘ही’ अभिनेत्री

शिवानी रांगोळेचा हा व्हिडीओ ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपात आहे. यामध्ये तिनं छानशा ड्रेसवर केसात गजरा माळलेला दिसत आहे. ‘हीरामंडी’तील ‘एक बार देख लीजिए’ या गाण्यावर शिवानीनं कथ्थक नृत्य सादर केलं आहे. शिवानीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या असून तिच्या नृत्य कौशल्याचं व अदाकारीचं कौतुक केलं आहे. शिवानीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या ‘मुंज्या’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई, दोन दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

हेही वाचा – Video: ड्रेसची लुंगी करत सोनाली कुलकर्णीचा ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

सध्या मालिकेत काय सुरू आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत नुकतंच मास्तरीण बाईंनी अधिपतीसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. कोल्हापुरी स्टाईलमध्ये अक्षराने अधिपतीला प्रपोज केल्याचं पाहिला मिळालं. गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षक या क्षणाची वाट पाहत होते आणि अखेर तो क्षण आला. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील हा भाग प्रेक्षकांचा खूप आवडला आहे. याबाबत सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.