Shivani Rangole shares video: अभिनेत्री शिवानी रांगोळे ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. तिला ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली. तिची अक्षरा ही भूमिका चांगलीच गाजली. अधिपती आणि अक्षरा यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता अभिनेत्री कोहम या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते. तसेच, सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम शिवानी रांगोळेने शेअर केला व्हिडीओ

नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. आज शिवानीचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त तिने कविता सादर केली आहे. ती अशी-

रेतीवर आपण अलगद असावं आणि पाण्याने पायांवर ये जा करावी
तशी वेळ येऊन निघून जाते…
एकदा गेलेली लाट परत येणाऱ्या लाटेसारखी कधीच नसते
घट्ट वाळूत रोवून उभं ठाकावं आणि स्वत:ची जागा निर्माण करावी
तसं आयुष्य रुतत जातं पण पायाभोवतीचा खड्डा सोडून
पाण्याबरोबर पुढे पुढे पुढे जावचं लागतं….
डोळ्यांत समुद्राने हेलकावत राहावं आणि नकळत दिवसाची रात्र व्हावी
तसं आयुष्य सरसर निघून जातं…
पण, ऐन मध्यात आल्यावरच मागे सुटलेल्या किनाऱ्याचं पुसटसं रूप दिसतं
अचानक समुद्राने अथांग व्हावं आणि आपण शाळेत नवीन आलेलं मूल
तसं आयुष्य मध्येच घाबरवतं…
प्रवाहाशी मैत्री करायची की नाही, हे आपल्यालाच ठरवावं लागतं
अलगद लाटांवर पाठ टेकवावी आणि त्यांनी घेऊन जावं पल्याड
तसं आयुष्य सोपंही असतं…
निरभ्र आकाश की खोल समुद्र
आपलं आपल्याला निवडायचं असतं…

हा व्हिडीओ शेअर करताना शिवानीने सर्वांचे आभार मानले आहेत. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवानी सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. विविध फोटो, पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. ती काहीवेळा कवितादेखील सादर करते. तिच्या कवितांना चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.

दरम्यान, अक्षरा या भूमिकेनंतर शिवानी कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.