शिवानी रांगोळे व विराजस कुलकर्णी यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट गेल्यावर या जोडीने २०२२ मध्ये अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नगाठ बांधली. विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक आहे. अनेक वर्षे एकमेकींशी ओळख असल्याने लग्नाआधीच शिवानीचं सासूबाईंशी एकदम सुंदर बॉण्डिंग होतं. मृणाल कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच सूनबाई व लेकाचं कौतुक करत असतात. आता शिवानीने खास पोस्ट शेअर करत सासूबाईंना गोड सरप्राईज दिलं आहे.

शिवानीने सासूबाईंची साडी नेसून सुंदर असं फोटोशूट केलं आहे. मृणाल कुलकर्णींच्या काळ्या रंगाच्या फ्लॉवर प्रिंटेड साडीमध्ये शिवानी अतिशय सुंदर दिसत आहे. या फोटोंना अभिनेत्रीने खास कॅप्शन देत लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : फिल्मफेअर सोहळा गुजरातला गेल्याने जितेंद्र आव्हाडांचा संताप; अक्षय कुमारचं नाव घेत म्हणाले, “मराठी मातीचा उपयोग फक्त…”

शिवानी सासूबाईंच्या साडीमधले फोटो शेअर करत लिहिते, “असंच… सासूबाईंची साडी नेसल्यावर आपण अधिक सुंदर दिसतो नाही का? विराजस हे सुंदर फोटो काढल्याबद्दल तुला खूप प्रेम!” अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच शिवानी व मृणाल यांच्या बॉण्डिंगचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : सिद्धार्थ जाधव मोठ्या पडद्यावर घेऊन येणार ‘लग्न कल्लोळ’! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीसह शेअर करणार स्क्रीन, कोण आहे ती?

View this post on Instagram

A post shared by Shivani Rangole Kulkarni (@rangshivani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिवानी आणि विराजसने ३ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. शिवानी आणि मृणाल कुलकर्णी यांच्यामध्ये सासू-सूनेपेक्षा मैत्रीचं नातं अधिक आहे. म्हणूनच शिवानी सासूबाईंना ताई या नावाने हाक मारते.