‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) या मालिकेतील अक्षरा व अधिपती यांच्यात सध्या दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षरा-अधिपतीच्या आयुष्यात चढ उतार येत आहेत. अधिपतीची आई भुवनेश्वरीच्या कट कारस्थानामुळे त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत, त्यामधून त्यांच्यात वाद व्हायला सुरुवात झाली होती. या भांडणांमुळे अक्षराने घर सोडण्याचा निर्णय घेतला. ती घर सोडत असताना अधिपतीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. अक्षराने घर सोडल्यानंतर मात्र अधिपतीला तिची उणीव भासली. दोघांनीही एकमेकांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, भुवनेश्वरीच्या कारस्थानांमुळे ते भेटू शकले नाहीत. ते एकमेकांना भेटू नयेत म्हणून भुवनेश्वरी वेळोवेळी विविध योजना बनवत असल्याचे दिसते. मात्र, भुवनेश्वरीच्या सर्व कट कारस्थानांना अपयश येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आता ती चूक…

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की अधिपती व अक्षराची अनेक दिवसांनंतर भेट झाली आहे. अधिपती अक्षराला म्हणतो, “आम्हाला सोडून कुठं जात नका जाऊ. आम्हाला तुमच्याशिवाय राहण्याची सवय नाही.” हे म्हणताना तो भावूक झाल्याचे दिसत आहे. त्याचे डोळे पुसत अक्षरा म्हणते, “मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, चूक झाली.” यावर अधिपती म्हणतो, “मग आता ती चूक सुधारा.” अधिपतीचे हे बोलणे ऐकल्यानंतर अक्षरा म्हणते, “मी त्यासाठीच आलीये, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तुम्ही बाबा होणार आहात.” ही गोड बातमी ऐकल्यानंतर अधिपतीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. त्यानंतर तो आनंदाने उड्या मारत अक्षरावर फुलांची उधळण करताना दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “गोड बातमी मिळणार, अक्षरा अधिपतीमधील दुरावा दूर होणार…?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अक्षराने अधिपतीचे घर सोडल्यानंतर तिला काही दिवसात समजले होते की ती आई होणार आहे. तिला ही बातमी अधिपतीला भेटून द्यायची होती, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकत नव्हता. दुर्गेश्वरी व भुवनेश्वरी दोघी मिळून कट कारस्थान करत होत्या. या सगळ्यात त्यांनी अक्षराच्या बहिणीलादेखील सामील करून घेतले होते. मात्र, अधिपतीचा मित्र व त्याच्या पत्नीने अक्षरा-अधिपती एकत्र यावेत यासाठी सतत प्रयत्न केले. अखेर, अधिपती व अक्षराची कित्येक दिवसांनंतर भेट होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता मालिकेत पुढे काय होणार, भुवनेश्वरीला अक्षरा-अधिपतीच्या भेटीबद्दल समजल्यानंतर ती काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.