तुनिषा शर्माच्या मृत्यूप्रकरणी तिचा को-स्टार आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खान पोलीस कोठडीत आहे. पोलिसांकडून त्याची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी तुनिषाच्या आईने पत्रकार परिषद घेऊन शिझानवर अनेक गंभीर आरोप केले होते, आता शिझान खानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे.
शिझानच्या बहिणीने पत्रकार परिषदेत सांगितले की तुम्ही फक्त त्यांची बाजू ऐकली आहे, “आता आमची बाजूदेखील ऐका.” तिने पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले की “जोपर्यंत ड्रग्सची गोष्ट आहे माझ्या भावाने कोणतेही ही ड्रग्स घेतलेले नाहीत. पोलिसांनीदेखील यावर तपास केला आहे काही निष्पन्न झाले नाही त्यामुळे हा मुद्दा इथेच संपून जातो.”
“पुन्हा प्रपोगंडा चित्रपट…” ‘द व्हॅक्सीन वॉर’ चित्रपटातील भूमिकेवरून अनुपम खेर ट्रोल
या पत्रकार परिषदेत शिझान बहिणीने त्याच्यावरील अनेक आरोपांवर भाष्य केले असून हिजाबच्या फोटोवरून ती म्हणाली, तुनिशाबरोबर माझं बहिणीसारखं नातं होतं. तुनिषाचा हिजाब घातलेला फोटो शोमधील आहे. जेव्हा आपण पौराणिक कथांवर आधारीत शो करतो तेव्हा आपण हिंदी शिकतो. भाषेचा धर्माशी काय संबंध? कोणतीही भाषा बोलणे म्हणजे धर्मांतर करणे नव्हे. धर्म वैयक्तिक आहे. आम्ही कोणावरही जबरदस्ती करत नाही. तुम्ही धर्मावर अडकलात, पण इथे प्रश्न मानसिक आरोग्याचा आहे. तुनिषाचा हिजाब घातलेला फोटो सेटवरील आहे. सीन दरम्यान तुनिषाने हिजाब परिधान केला होता. त्याच दृश्याचा हा फोटो आहे. सेटवर गणपतीचे सेलिब्रेशन सुरू होते.”
“शिझान-तुनिषाचं ब्रेकअप झालंच नाही” अभिनेत्याच्या बहिणीचा दावा; तुनिषाच्या आईवर केले गंभीर आरोप
शिझानच्या कुटुंबीयांनी सांगितले की, “२४ डिसेंबरला तुनिषा शूटिंगसाठी एकटीच आली होती. तुनिषा सकाळपासून अस्वस्थ होती. तिने व शिझानने एकत्र वेळ घालवला, त्यांनी गाणी ऐकली, नंतर शिझान सेटवर सीन शूट करण्यासाठी गेला आणि इकडे तुनिषाने आत्महत्या केली, असा दावा शिझानच्या कुटुंबाने केला. त्यांनी तुनिषाच्या मृत्यूसाठी तिच्या आईलाच जबाबदार धरलं आहे.”