टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तिचा सहकलाकार शिझान खानला पोलिसांनी अटक केली आहे. तुनिषा आणि शिझान ‘अलीबाबा: दास्तान-ए-काबुल’ या टीव्ही मालिकेत एकत्र काम करत होते. दोघंही या मालिकेत मुख भूमिका साकारत होते. पण आता तुनिषाची आत्महत्या आणि शिझानच्या अटकेनंतर मालिकेच चित्रिकरण थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर आता मुख्य भूमिकेत कोणते कलाकार दिसणार अशी चर्चा होती.
मालिकेचं चित्रिकरण थांबवण्यात आल्यानंतर एपिसोड बँकच्या माध्यमातून मालिकेचं प्रसारण केलं जात होतं. मात्र आता ते एपिसोडही संपल्यामुळे नव्या कलाकारांबरोबर चित्रिकरण सुरू करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्याचं बोललं जात आहे. यात मुख्य भूमिकांसाठी दोन कलाकारांची नावं सर्वाधिक चर्चेत आहेत.
आणखी वाचा- तुनिषा शर्मा प्रकरण : शिझान खानला मोठा दिलासा, न्यायालयाने दिली ‘ही’ सूट
रिपोर्टनुसार तुनिषाच्या जागी अभिनेत्री अवनीत कौर राजकुमारी मरियमच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. तर शिझानच्या जागी अभिनेता अभिषेक निगमचं नाव चर्चेत आहे. मात्र याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे अद्याप याची पुष्टी होऊ शकलेली नाही. पण ही माहिती खरी असल्यास अवनीत आणि अभिषेक पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.
आणखी वाचा- Tunisha Sharma suicide case: “तिची आई तिचा छळ…” तुनिषा शर्माच्या मामाने केला खुलासा
दरम्यान काही रिपोर्टनुसार मालिकेच्या सेटचं लोकेशन बदलण्यात आलं असून शोचं चित्रिकरण नव्या स्टुडिओमध्ये सुरू करण्यात आलं आहे. तर तुनिषा आणि शिझानच्या प्रकरणात अद्याप सुनावणी बाकी आहे. शिझानच्या जामिनाच्या याचिकेवर ७ जानेवारीला सुनावणी होणार आहे. यादरम्यान तुनिषाच्या आईने प्रेस कॉन्फरन्स घेत शिझान आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते. तर त्यानंतर शिझानच्या बहिणींनी आपल्या वकिलाबरोबर प्रेस कॉन्फरन्स घेत तुनिषाच्या कुटुंबियांबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.