Tunisha Sharma suicide case : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून अटकेत असलेल्या शिझान खानला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने शिझानला एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तुनिषा शर्माच्या आत्महत्येच्या आरोपाखाली शिझानला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता.

जामीन मंजूर झाल्यावर शिझान खान नुकताच तुरुंगातून बाहेर पडला आहे. शिझानच्या सुटकेचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिझान तुरुंगाबाहेर येताच त्याच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले आणि शिझानच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. शिझान खानच्या बहिणी फलक आणि शफक यांनी सोशल मीडियावर याबद्दल न्यायालयाचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावर सध्या शिझानच्या सुटकेचे फोटोज व्हायरल होत आहेत.

आणखी वाचा : रविना टंडनवर ‘या’ कारणासाठी भडकलेला अजय देवगण; म्हणाला “ती अत्यंत खोटारडी…”

तुनिषाने २४ डिसेंबर या दिवशी मालिकेच्या सेटवरच गळफास लावत आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येप्रकरणी आई वनिता शर्माच्या तक्रारीवरून तिचा सहकलाकार शिझान खानला अटक करण्यात आली होती. शिझान व तुनिषा सब टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’मध्ये मुख्य भूमिका साकारत होते. तुनिषाच्या आत्महत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. तेव्हापासून शिझान खान कोठडीत होता.

दरम्यान या प्रकरणात वेगवेगळ्या गोष्टी समोर येत होत्या आता शिझानला जामीन मिळाल्याने तुनिषाच्या केसला वेगळं वळण मिळालं आहे. आत्महत्या करणारी तुनिषा २० वर्षांची होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं. तिने तिच्या करिअरची सुरुवात इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून केली होती. तुनिषा सब टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’मध्ये मुख्य भूमिका साकारत होती.