अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही छोट्या पडद्यावरील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज काही ना काही पोस्ट शेअर करत ती चाहत्यांना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी शेअर करत असते. परंतु अलीकडेच दिव्यांकाला तिच्या एका इन्स्टा लाइव्हमुळे ट्रोल करण्यात येत आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर तिने हा अनुभव इन्स्टा लाईव्ह करत चाहत्यांना दिला. भूकंपाच्या वेळी तिने अशी प्रतिक्रिया दिली की अनेकांनी तिला प्रचंड ट्रोल केलं.

मंगळवारी उत्तर भारतात काही सेकंदांपुरता ६.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यादरम्यान अनेक लोक घरं आणि इमारतींमधून बाहेर पडले. त्यादरम्यान दिव्यांकाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ती तिथे एका नातेवाईकांच्या घरी गेली होती आणि हादरे बसताच तिने इंस्टाग्रामवर लाईव्ह करत हे सगळं घडत असताना तिला खूप एक्साइटेड वाटत असल्याचं तिने सांगितलं.

आणखी वाचा : Video: चुलीवर अन्न शिजवलं, जमिनीवर बसून जेवली अन्…; रुबिना दिलैकच्या साधेपणाचं सर्वत्र कौतुक

व्हिडीओमध्ये दिव्यांका म्हणताना दिसते की, “हे खूप रोमांचक आहे कारण मी आयुष्यात पहिल्यांदाच भूकंपाचा अनुभव घेत आहे. प्रत्येकजण आपापल्या घरतून खाली आला आहे. जोवर परिस्थिति आणखी गंभीर होत नाही तोपर्यंत हे रोमांचक आहे.” तसंच यानंतर ती आजूबाजूच्या लोकांच्या प्रतिक्रियाही घेते.

हेही वाचा : काळं जॅकेट, डोक्यावर हेल्मेट…’या’ आघाडीच्या अभिनेत्रीने मुंबईच्या रस्त्यांवर लुटला बाईक राईडचा आनंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण तिचं हे बोलणं फारच खटकलं. यावर अनेकांनी तिला परिस्थितीचं गांभीर्य समजतं का तुला? लोकांचा जीव धोक्यात आला आहे आणि तू ही काय प्रतिक्रिया देतेस!”, “तू भावनाशून्य झालीस का? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.” असं म्हणत ट्वीतस्क करत तिच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता दिव्यांका चर्चेत आली आहे.