उर्फी जावेद तिच्या विचित्र कपड्यांमुळे कायम चर्चेत असते. तिच्या अतरंगी फॅशनमुळे ती अनेकदा वादातही सापडली आहे. पण ती तसेच कपडे परिधान करते. मात्र अचानक ३१ मार्च रोजी तिने एक ट्वीट केलं आणि आपण यापुढे असे कपडे परिधान करणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अनेकांना उर्फी आता विचित्र कपडे परिधान करणार नाही, असं वाटत होतं, पण हे खरं नाहीये. कारण उर्फीने आज सकाळी एक ट्वीट करत यु-टर्न घेतला आहे.

हेही वाचापरिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांची लव्ह स्टोरी नेमकी कधी सुरू झाली, जाणून घ्या

उर्फी जावेदने ३१ मार्च रोजी केलेलं ट्वीट काय होतं?

उर्फीने ट्वीट करत कपड्यांमुळे भावना दुखावल्याचं म्हणत माफी मागितली आहे. “माझ्या कपड्यांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यासाठी मी माफी मागत आहे. यापुढे तुम्हाला बदलेली उर्फी पाहायला मिळेल. कपडेही बदलेले असतील. माफी,” असं उर्फीने ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

दुसऱ्या ट्वीटमध्ये उर्फीने काय म्हटलंय?

उर्फी जावेदने आज १ एप्रिल रोजी ट्वीट करत सर्वांना एप्रिल फूल बनवले आहे. “एप्रिल फूल. मला माहीत आहे की मी खूप बालिश आहे,” असं ट्वीट उर्फीने केलं आहे. त्यामुळे ती तिची अतरंगी फॅशन करणं सोडणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उर्फीच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींच्या मते उर्फी एप्रिल फूल करतेय हे आधीच कळलं होतं, कारण ती कधीच बदलू शकत नाही. तर, काहींनी हसण्याचे इमोजी टाकले आहेत.