scorecardresearch

Premium

उर्फी जावेदची एंगेजमेंट झाली? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

उर्फी जावेदचे मिस्ट्री मॅनबरोबरचे फोटो व्हायरल, अभिनेत्रीने उरकला साखरपुडा?

urfi javed engagement photos viral
उर्फी जावेदचे फोटो व्हायरल (फोटो – इन्स्टाग्राम व विरल भयानी एक्स)

सोशल मीडियावर आपल्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेद हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून तिने साखरपुडा केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. उर्फीने याबाबत कोणतीही पोस्ट केलेली नाही, पण तिचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

“वेडा आहेस का?” नाना पाटेकरांना चित्रपटात न घेण्याचा विवेक अग्निहोत्रींना मिळालेला सल्ला; नाना म्हणाले, “माझ्या गावात…”

Marathi actor Adish Vaidya entry in Kavyanjali
Video: ‘काव्यांजली’ मालिकेत नव्या प्रीतमची जबरदस्त एन्ट्री, पाहा व्हिडीओ
radha sagar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने दाखवली बाळाची पहिली झलक, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
riteish deshmukh shared romantic video with wife genelia deshmukh
‘तुझे मेरी कसम’ ते ‘वेड’, रितेश-जिनिलीयाचा रोमॅंटिक व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले, “दादा-वहिनी…”
arjun kapoor
“तुझी नेहमी आठवण येत राहील”; अर्जुन कपूरच्या पाळीव श्वानाचं निधन; अभिनेत्याने शेअर केली भावनिक पोस्ट

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये उर्फी काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. तर शेजारी बसलेल्या तरुणाचा चेहरा मात्र लपवण्यात आला आहे. दोघांच्या समोर हवन सुरू आहे. उर्फीने डोक्यावर ओढणी घेतली आहे. फोटो पाहून असं दिसतंय की उर्फी एकतर त्या तरुणाच्या बोटात काहीतरी घालत आहे नाहीतर त्याच्या हाताला काहीतरी बांधत आहे. मात्र फोटो स्पष्ट नसल्याने काही कळत नाहीये.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक उर्फीला कमेंट करून शुभेच्छा देत आहेत. तसेच अनेक जण तो मुलगा कोण आहे, याबाबत विचारणा करत आहेत. पण हा फोटो व्हायरल असल्याने हा खरा आहे की उर्फीच्या शुटिंगचा आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Urfi javed engagement photos viral on social media hrc

First published on: 03-10-2023 at 15:14 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×