उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. उर्फी ही चित्रविचित्र कपडे परिधान करत रस्त्यावर फिरत असल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी याबद्दल आक्षेप नोंदवला होता. त्यांच्यातील हा वाद मिटत नाही तोपर्यंत आता उर्फीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यात उर्फीने अश्लील इशारे करत बोल्ड वक्तव्य केलं आहे.

उर्फी जावेद ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजने उर्फीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्फी ही एका शूटींगच्या लोकेशनवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : ‘…तरच मी काढेन’ वीणाच्या नावाचा टॅटू लपवण्यावर शिव ठाकरे स्पष्टच बोलला

यावेळी उर्फीने गोल्डन रंगाची साडी परिधान केली असून त्याचा रंगाचा ब्लाऊज घातला आहे. या व्हिडीओत उर्फी ही कॅमेऱ्यासमोर पाहून अश्लील इशारे करत आहे. त्याबरोबरच ती ‘माझे माझ्या स्तनांवर प्रेम आहे’, असेही म्हणते.

आणखी वाचा : “माझ्या तोंडाजवळचा घास…” मराठी चित्रपट न करण्याबद्दल शिव ठाकरेचे भाष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. “हिच्याबरोबर नेमकं काय चुकीचं घडलंय हेच मला समजत नाही”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने ‘सस्ता नशा’ असे कमेंट करत म्हटले आहे. हिला “कोणतरी उचलून फेकून द्या, खरंच”, असे एकाने कमेंट करत म्हटले आहे.