छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला. ती ३९ वर्षांची होती. तिच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तिच्या निधनानंतर अपघातावेळी काय घडलं होतं, याबद्दल विविध दावे केले जात आहेत. आता पोलिसांनी ही घटना कशी घडली याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

वैभवी उपाध्यायच्या निधनानंतर कुल्लूचे पोलीस अधिकारी साक्षी वर्माच्या यांनी पीटीआयशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घटना कशी घडली, तिचा मृत्यू कसा झाला, याबद्दल सांगितले आहे. पोलीस अधिकारी साक्षी वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभवीची कार दरीत कोसळल्यानंतर तिने तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिचा मृत्यू झाला.
आणखी वाचा : वैभवी उपाध्यायने निधनाच्या १६ दिवसांपूर्वी केलेली पोस्ट चर्चेत, म्हणालेली…

“कारचा अपघात झाल्यानंतर वैभवीने गाडीच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी तिच्या डोक्याला दुखापत झाली. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. यानंतर तिला तातडीने बंजार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.” अशी माहिती कुल्लूचे पोलीस अधिकारी साक्षी वर्मा यांनी दिली.

कुल्लूच्या बंजार भागातील सिधवानजवळील दरीत कोसळल्याने सोमवारी वैभवी उपाध्याय यांचा मृत्यू झाला. वैभवीने सीट बेल्ट लावला नव्हता, अशाही चर्चा सध्या रंगताना दिसत आहेत. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आणखी वाचा : “तुम्हाला आशीर्वाद…” आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधल्यानंतर पहिल्या पत्नीची पोस्ट, म्हणाली “खूप खंबीर…”

दरम्यान वैभवी उपाध्यायच्या कारचा अपघात सोमवारी (२२ मे) हिमाचल प्रदेशातील कुल्लू या ठिकाणी झाला. हा अपघात इतका भीषण होता की वैभवीचा जागीच मृत्यू झाला. वैभवी ही तिच्या होणाऱ्या पतीबरोबर फिरण्यासाठी गेली होती. वैभवीच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते.

आणखी वाचा : Vaibhavi Upadhyaya Died : ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा कार अपघातात मृत्यू, सिनेविश्वावर शोककळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैभवीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘सीआयडी’, ‘अदालत’ आणि ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या तिच्या काही गाजलेल्या मालिका आहेत. यातही ‘साराभाई’ या मालिकेतील जास्मीन या पात्राने तिला विशेष ओळख मिळवून दिली. वैभवीने २०२० मध्ये ‘छपाक’ या चित्रपटातही काम केले होते. यावेळी ती प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणबरोबर झळकली होती. त्याबरोबरच तिने ‘तिमिर’ (२०२३) या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. गुजराती कलाविश्वात तिचं मोठं नाव होतं. वैभवीने ‘क्या कसूर है अमला का’ आणि ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ या डिजीटल सीरिजमध्येही काम केले.