Vaishnavi Kalyankar Shared Glimpes Of First Ganesh Chaturthi Celebration After Marraige : गणेशोत्सव हा महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. आज अनेक जण गणेश चतुर्थीनिमित्त सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर करत आहेत. अशातच अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिनेसुद्धा नुकतच गणेशोतसवनिमित्त फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत.

वैष्णवीसाठी यंदाचा गणेशोत्सव खास आहे कारण- लग्नानंतर ती पहिल्यांदाच तिच्या नवऱ्याबरोबर म्हणजेच अभिनेता किरण गायकवाडसह हा सण साजरा करत आहे. म्हत्त्वाचं म्हणजे तिने लग्नानंतरच्या तिच्या पहिल्या गणेश चतुर्थीनिमित्त खास मोदकही बनवले आहेत.

वैष्णवी कल्याणकरने बनवले मोदक

लग्नानंतर वैष्णवी किरणच्या घरी म्हणजेच तिच्या सासरी छान रुळलेली तिने शेअर केलेल्या फोटो व व्हिडीओमधून पाहायला मिळतं. याबद्दल तिने एका मुलाखतीतही सांगितलं होतं. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटो व व्हिडीओमधून ती बाप्पासाठी खास स्वत:च्या हाताने मोदक बनवत असल्याचं पाहायला मिळतं.

वैष्णवीसह किरण गायकवाडनेही सोशल मीडियावर बायकोबरोबरचे व कुटुंबाबरोबरचे खास फोटो शेअर केले आहेत. लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सवानिमित्त त्याने फोटो शेअर केलेले पाहायला मिळाले. लग्नानंतर पहिल्यांदाच त्यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले असून यावेळी दोघेही पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळाले.

वैष्णवी कल्याणकर अलीकडे चर्चेत आली ते तिच्या आगामी ‘घुबडकुंड’ चित्रपटामुळे. यानिमित्त तिने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिलेली. ज्याममध्ये तिने तिच्या सासुबाईंबद्दल व सासरच्या मंडळींबद्दल सांगितलेलं. ती म्हणालेली की, सासरी त्यांचं छोटं कुटुंब आहे आणि अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी सासुबाई पाठिंबा देत आहेत ही तिच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे.

वैष्णवीबद्दल बोलायचं झालं तर ती मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनयासह वैष्णवी सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिथे तिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली ते ‘झी मराठी’वरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेतून. यामध्ये तिने अभिनेत्री दीपा परब चौधरीच्या लेकीची भूमिका साकारलेली.

वैष्णवीने या मालिकेसह ‘झी मराठी’वरील ‘देवमाणूस’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली. त्यानंतर ‘तीकळी’ मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकली. यानंतर आता ती ‘घाबडकुंड’ या आगामी चित्रपटातून झळकणार आहे.