‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी वनिताने तिच्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला होता. बॉयफ्रेंड सुमित लोंढेबरोबरचा फोटो शेअर करत तिने प्रेमाची कबुली दिली होती. आता वनिता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याचपूर्वी तिने केलेलं प्री-वेडिंग शूट चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा – Athiya Shetty-KL Rahul Wedding : लुंगी, सदरा अन् कोल्हापुरी चप्पल; लेकीच्या लग्नात सुनील शेट्टीच्या साधेपणाने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

वनिताने प्री-वेडिंग शूट केलं आहे. इतकंच नव्हे तर यादरम्यान तिने काढलेले सुमितबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले. ओल्याचिंब अंगाने होणाऱ्या नवऱ्याला किस करतानाचा फोटो वनिताने शेअर केला. हा फोटो पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. आता वनिता व सुमितचा नवा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.

वनिताने सुमितला मिठी मारतानाचा नवा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघंही फारच सुंदर दिसत आहेत. फोटो शेअर करताना वनिताने म्हटलं की, “बोलक्या प्रश्नांनी साऱ्या कवेतच निरुत्तर व्हावे, गंध दरवळावा प्रेमाचा आपणही मग अत्तर व्हावे.” वनिताच्या या फोटोवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी मंडळींनीही कमेंट केली आहे. तसेच तिच्या फोटोशूटचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – उर्फी जावेदचा चेहराच बदलला, झाली अशी अवस्था की फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनीही उडवली खिल्ली

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वनिता व सुमित येत्या २ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अनेक मंडळींशी सुमितची मैत्री आहे. त्यांच्यासह अनेक फोटोही त्याने शेअर केले आहेत. आता वनिता व सुमितचे आणखी रोमँटिक फोटो चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत.