छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून वीणा जगताप हिच्याकडे पाहिले जाते. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच वीणा जगतापने एक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
वीणा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय आहे. नुकतंच वीणाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती श्रीनगरमधील दल सरोवर परिसरातील हाऊस बोटीचा आनंद घेताना दिसत आहे. याचे दोन फोटोही तिने शेअर केले आहेत. या फोटोत तिच्या आजूबाजूचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळत आहे. याला तिने छान गाण्यांच्या ओळी कॅप्शनमध्ये लिहिल्या आहेत.
आणखी वाचा : “मी नेहमी तुझ्याबरोबर…” वीणा जगताप आणि शिव ठाकरे पुन्हा येणार एकत्र, पोस्ट चर्चेत
वीणा जगतापची पोस्ट
“न उमर की सीमा हो
न जनम का हो बंधन
जब प्यार करे कोई
तो देखे केवल मन”, असे तिने या पोस्टला कॅप्शन देताना म्हटले आहे.
आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली
तिच्या या पोस्टचा संदर्भ अनेकांनी शिव ठाकरेशीही लावल्याचे पाहायला मिळत आहे. या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहे. ताई तू आणि शिव दादा एकत्र या, अशी कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत. शिव-वीणा हीच परफेक्ट जोडी आहे, अशी कमेंट एकाने केली आहे. तर अनेकांनी या पोस्टखाली शिव ठाकरे असे लिहित हार्ट इमोजी शेअर केले आहेत.