अभिनेत्री विद्या बालन ही बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयाशिवाय तिचे सोशल मीडियावरील रिल्स व्हिडीओ सुद्धा चर्चेत असतात. नुकताच विद्याने मराठमोळ्या अंदाजात एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री ‘चला हवा येऊ द्या’ फेम भाऊ कदम यांची नक्कल करताना दिसत आहे.

हेही वाचा : Video : “देहूगावची माती, तुळस अन्…”, सोनाली कुलकर्णीने हाताने घडवली बाप्पाची मूर्ती; म्हणाली, “यंदा गणेशोत्सव भावनिक…”

मराठी विनोदवीर भाऊ कदमच्या ‘चला हवा येऊ द्या’मधील गाजलेल्या स्किटवर विद्या बालनने मजेशीर व्हिडीओ बनवला आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओला “ऐका हो ऐका” असं मराठीत कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : प्रसिद्ध मराठी गायिकेला मिळाली सचिन तेंडुलकरसमोर गाण्याची संधी, अनुभव शेअर करत म्हणाली, “ते आणि अंजली खूप…”

विद्या बालनच्या या मराठी रिल्सची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या व्हिडीओवर “मराठी लय भारी”, “काय सांगता हो भाऊ भारीच”, “कडक”, “विद्या मॅडम खूपच छान” अशा कमेंट्स केल्या आहे. विद्या बालन अनेक मुलाखतींमध्ये मराठी संस्कृती, परंपरा, चित्रपट यांविषयी भरभरून बोलताना दिसते. त्यामुळे अनेकांनी “तुम्ही मराठी चित्रपटांमध्ये केव्हा काम करणार?” असा प्रश्न तिला कमेंट्समध्ये विचारला आहे.

हेही वाचा : “मराठी माणसाने पाय खेचण्याची वृत्ती सोडली पाहिजे”, कोकण हार्टेड गर्ल स्पष्टच बोलली; म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विद्या बालन नुकतील ‘नीयत’ या चित्रपटामध्ये झळकली होती. या चित्रपटात अभिनेत्रीने गुप्तहेराची भूमिका साकारली होती. लवकरच ती अभिनेता प्रतीक गांधीसह एका कॉमेडी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट वर्षाखेरिस किंवा २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.