Rutuja Bagwe Video: मराठी सिनेसृष्टीसह आता हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजेच ऋतुजा बागवे. अनेक मराठी नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये ऋतुजाने वेगवेगळ्या भूमिका साकारत स्वत:ला वेळोवेळी सिद्ध केलंय. ही अभिनेत्री आता ‘माटी से बंधी डोर’ या ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील मालिकेत झळकतेय. या मालिकेत ऋतुजा वैजयंती ही भूमिका साकारतेय.

ऋतुजा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती अनेकदा चाहत्यांबरोबर शेअर करत असते. ऋतुजाचे इन्स्टाग्राम रील्सही अनेकदा चर्चेत असतात. आता अशीच एक डान्स रील घेऊन ऋतुजा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

हेही वाचा… जान्हवी कपूरने मराठमोळ्या ऋतुजा बागवेच्या नव्या मालिकेचा प्रोमो केला शेअर; जाणून घ्या कनेक्शन

ऋतुजाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ऋतुजा अभिनेता अंकित गुप्ताबरोबर ‘कन्मणी’ या तमिळ गाण्यावर थिरकली आहे. ‘कन्मणी’ हे गाणं सध्या ट्रेंडिंग आहे. इन्फ्लूएसंर्ससह अनेक मराठी कलाकार या गाण्यावर थिरकताना दिसतायत. ‘माटी से बंधी डोर’फेम वैजूचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफन व्हायरल होतोय.

ऋतुजा बागवे व्हायरल व्हिडीओ (Rutuja Bagwe Viral Video)

या व्हिडीओत अंकित आणि ऋतुजाने हटके डान्स स्टेप करत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. ऋतुजाने या डान्ससाठी खास काळ्या रंगाची साडी नेसली आहे आणि त्यावर मॅचिंग ब्लाऊज घातलं आहे.अभिनेत्रीने केस खुले ठेऊन मागे गजरादेखील माळला आहे. तर अंकितनेदेखील तिला मॅच करत काळ्या रंगाचा सूट घातला आहे. “आम्ही कसे वाटतोय” असं कॅप्शन अंकितने या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा… “काश मैं लडका होता” असं ऋतुजा बागवे गौरी नलावडेचा फोटो पाहून का म्हणाली?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऋतुजाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ऋतुजाने याआधी ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘चंद्र आहे साक्षीला’ अशा अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सोबो फिल्म्स’ प्रोडक्शन हाऊस निर्मित ‘माटी से बंधी डोर’ या मालिकेत ऋतुजा प्रमुख भूमिका साकारतेय. या मालिकेत समिधा गुरू, सारिका नवाथे, अभय कुलकर्णी, रेशम असे मराठमोळे कलाकार या मालिकेत निर्णायक भूमिका साकारताना दिसतायत.