अभिनेत्री विशाखा सुभेदार कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकामुळे चर्चेत आहेत. विशाखा सुभेदारने मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. एक उत्तम कॉमेडियन म्हणून तिला ओळखले जाते. कायमच विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली विशाखा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आताही असंच काहीसं घडलं आहे. विशाखा सुभेदारच्या धम्माल डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो.

विशाखा सुभेदार सध्या ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकाच्या प्रयोगांसाठी महाराष्ट्रभर प्रवास करत आहे. नुकताच विशाखा सुभेदार आणि टीमचा नाशिक येथे नाट्यप्रयोग होता. यावेळी नाटकाच्या प्रयोगाआधी मिळालेल्या रिकामी वेळात संपूर्ण टीम ‘उंदीर मामा’ या ट्रेंडिंग गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसली. विशाखा सुभेदारने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डलवर या धम्माल डान्सचा व्हिडीओ शेअर केला असून तो खूप व्हायरल होत आहे.

आणखी वाचा- “नशिबात असेल तर…” विशाखा सुभेदारच्या चाहत्याने व्यक्त केली अनोखी इच्छा, अभिनेत्रीची कमेंट चर्चेत

सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत असलेल्या ‘उंदीर मामा’ गाण्यावर ठेका धरायचा मोह ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकाच्या टीमलाही आवरता आला नाही. विशाखाने या आपल्या टीमबरोबर धम्माल डान्स करताना व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना लिहिलं, “मध्ये मध्ये घुसणारी माझी गँग,आज मैदानात उतरली काहीही तालीम नाही तरी कॉन्फिडन्स का पैसा है… ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटक टीम. आज नाशिक दौरा एन्जॉय करताना.”

विशाखा सुभेदार आणि तिच्या टीमच्या ‘उंदीर मामा’ डान्सचा हा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत असून त्यावर सोशल मीडिया युजर्सनीही धम्माल प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, “बाई! बाई! बाई! बाई! मज्जाच चाललीये !!” आणखी एका युजरने लिहिलं, “मस्त झालाय पण, छान गोळा केलाय डान्स” आणखी एका युजरने, “सही… कल्ला… जाळ” अशी कमेंट केली आहे. याशिवाय इतर बऱ्याच युजर्सनी विशाखा आणि टीमच्या या डान्सचं भरभरून कौतुक केलं आहे.

आणखी वाचा- “म्हणून मग…” पाकिस्तानी गायकाच्या ट्रेंडिंग गाण्यावर विशाखा सुभेदारचा हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशाखा सुभेदारने ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली. विशाखा सुभेदारने आतापर्यंत ‘फक्त लढ म्‍हणा’ (२०११), ‘४ इडियट्स’ (२०१२) आणि ‘अरे आवाज कोनाचा’ (२०१३) अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या ती ‘कुर्रर्र’ या नाटकात काम करत आहे.