Vishal Nikam Shares Video with Akshaya Hindalkar: अभिनेत्री अक्षया हिंदळकर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. ‘पी. एस. आय. अर्जुन’ या चित्रपटातून अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत आहे.

सध्या या चित्रपटाचे कौतुक होताना दिसत आहे. अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे आज तिचा वाढदिवस आहे. या निमित्ताने लोकप्रिय अभिनेता विशाल निकमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

विशाल निकमने अक्षया हिंदळकरबरोबर शेअर केलेला व्हिडीओ पाहिला का?

विशाल निकमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्याबरोबर अक्षया हिंदळकर असल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षया व विशाल एका गाण्यावर अॅक्टिंग करताना दिसत आहेत. हा व्हि़डीओ शेअर करत विशाल निकमने लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा, सखी. तू जगातली सगळ्यात प्रेमळ आणि गुणी मुलगी आहेस. काहीही झालं तरी मी तुझ्याबरोबर आहे”, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

विशाल निकमने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांसह कलाकारांनीदेखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशाल निकमने लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या भावाची सौंदर्या”, सचित पाटीलनेदेखील वाढदिवसाच्या शुभेच्छा, अशी कमेंट केली आहे. माधुरी पवारनेदेखील वाढदिवसाच्या शुभेच्छा असे लिहिले आहे. अनेक चाहत्यांनी अक्षयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेचा उल्लेख केल्याचे पाहायला मिळत आहे.

विशाल निकम व अक्षया हिंदळकर ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र काम करताना दिसले होते. या मालिकेत विशाल निकमने युवराज तसेच अक्षयाने श्रुती ही भूमिका साकारली होती.

अक्षया हिंदळकरला ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेतून मोठी प्रसिद्धी मिळाली. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेत अक्षयाने वसुंधरा ही भूमिका साकारली होती. आता सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अबोली’ या मालिकेत सुप्रिया ही भूमिका साकारताना दिसत आहे.

विशाल निकमच्या कामाबद्दल बोलायचे तर तो सध्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेतील त्याच्या राया या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हे कलाकार सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात.