रॅपर एमसी स्क्वायर एम टीव्हीच्या ‘हसल २.०’ मुळे बराच लोकप्रिय झाला आहे. त्याच्या रॅपने संपूर्ण देशभरातील युवा पीढीला वेड लावलं आहे. तो या शोचा विजेताही ठरला. त्यानंतर त्याचा आणि अभिनेत्री शहनाझ गिलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. स्क्वायरने त्याच्या इन्स्टाग्रामवर शहनाझबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याचा आणि शहनाझचा क्यूट बॉन्ड पाहायला मिळत आहे.

बुधवारी रॅपर एमसी स्क्वायरने शहनाझ गिलबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्यांच्या आगामी प्रोजेक्टच्या संदर्भात आहे. या फोटोमध्ये दोघंही एका रेकॉर्डिंग रुममध्ये बसलेले दिसत आहेत आणि हसत हसत कॅमेराला पोज देताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना एमसी स्क्वायरने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय ‘व्हाट्स कुकिंग?’ त्याचा हा फोटो आणि कॅप्शन सोशल मीडियावर बरंच चर्चेत आहे.

आणखी वाचा- सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाझ गिल भावुक; म्हणाली, “तू फक्त…”

View this post on Instagram

A post shared by MC SQUARE | LAMBARDAR (@mcsquare7000)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही पोस्ट समोर आल्यानंतर, एमसी स्क्वायरचे नवीन रॅप गाणे येत आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. एमटीव्ही हसलच्या अधिकृत हँडलने ‘ना कंटाळवाणे दिवस, ना कंटाळवाणे लोक.’ अशी कमेंट केली आहे. याशिवाय प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहनेही या पोस्टवर कमेंट केली आहे. ‘दोन गोड व्यक्ती एकत्र दिसले.’ असं त्यानं लिहिलं आहे. लोकप्रिय संगीतकार यशराज मुखाटे यांनी, “मजेदार कोलॅब.” या फोटोची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. दरम्यान शहनाझ गिल लवकरच सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी का जान’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे.