scorecardresearch

“सिद्धार्थ शुक्ला मला मारहाण करायचा” शिल्पा शिंदेने अभिनेत्यावर केलेले गंभीर आरोप, म्हणाली “त्याने मला चालत्या गाडीतून…”

शिल्पा शिंदेने सिद्धार्थ शुक्लावर केलेले गंभीर आरोप

shilpa shinde on siddharth shukla
शिल्पा शिंदेंने सिद्धार्थ शुक्लावर केलेले गंभीर आरोप. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शिल्पा शिंदे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. भाभीजी घर पर है मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या शिल्पाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. करिअरप्रमाणेच शिल्पा अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. शिल्पाचं नाव दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबरोबरही जोडलं गेलं होतं.

सिद्धार्थ शुक्लाने ‘बिग बॉस हिंदी १३’च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर शिल्पाने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. २०२० मध्ये सिद्धार्थ बिग बॉस हिंदीचा विजेता ठरला होता. त्यानंतर शिल्पाने एका मुलाखतीत सिद्धार्थ शुक्लाबाबतच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलं होतं. “मी सिद्धार्थ शुक्लाबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. सिद्धार्थ हा आक्रमक होता. तो मला अपमानास्पद वागणूक द्यायचा”, असं शिल्पा म्हणाली होती.

हेही वाचा>>कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्राची लगीनघाई! लग्नात सुरक्षा पुरविणाऱ्या बॉडीगार्डचं शाहरुख खानशी आहे खास कनेक्शन

सिद्धार्थची एक ऑडियो क्लिपही व्हायरल झाली होती. यामध्ये तो शिवीगाळ करत असल्याचं ऐकू येत होतं. शिल्पाने ही ऑडियो क्लिप सिद्धार्थची असल्याचं म्हटलं होतं. “एक बॉयफ्रेंड व गर्लफ्रेंडमधील हा संवाद आहे. मारझोड केल्यानंतर त्याने मला चालत्या गाडीतूनही फेकून दिलं होतं. तो मला नेहमी मारहाण करायचा. त्याच्याविरोधात मी पोलिसांतही तक्रार केली होती”, असं शिल्पा म्हणाली होती.

हेही वाचा>> Video: मंगलाष्टकं संपताच वनिता खरातला उचलून घेतलं अन्…; लग्नातील व्हिडीओ व्हायरल

“सिद्धार्थ मला सारखा फोन करायचा. मी कुठे आहे ते त्याला जाणून घ्यायचं असायचं. कुठे मरत होतीस? असं तो मला म्हणायचं. त्यानंतर तो मला सॉरी म्हणायचा”, असं म्हणत शिल्पाने गंभीर आरोप केले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 18:40 IST
ताज्या बातम्या