Will Vallari Viraj and Alapini be work together again: ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेने जवळजवळ वर्षभर प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पण, या एका वर्षात मालिकेला मोठी लोकप्रियता मिळाली.

कलाकारांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मालिका संपली तेव्हा प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले.

या मालिकेत वल्लरी विराज व राकेश बापट हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसले होते. त्यांच्याबरोबरच मालिकेत भारती पाटील, शर्मिला शिंदे, आलापिनी निसळ, प्रसाद लिमये, सानिका काशिकर, राज मोरे, शील क्षीरसागर असे अनेक कलाकार दिसले होते. मालिका संपल्यानंतर या कलाकारांना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते.

वल्लरी विराज व आलापिनी पुन्हा एकत्र झळकणार?

आता राज मोरे, सानिका काशिकर, भारती पाटील व शर्मिला शिंदे हे कलाकार झी मराठी वाहिनीवरील नवीन मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत दिसणार आहेत. काही प्रोमो आणि सोशल मीडियावरील पोस्ट यांमधून त्यांच्या नवीन भूमिकेची झलक पाहायला मिळत आहे.

आता या कलाकारांपाठोपाठ वल्लरी विराज आणि आलापिनीदेखील एका नव्या प्रोजेक्टमध्ये दिसण्याची शक्यता आहे. आलापिनी, तसेच वल्लरी विराजने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये कामासंबंधीचा उल्लेख आहे. त्यांच्याबरोबर अभिनेता इंद्रनील कामतदेखील दिसत आहे.

वल्लरी विराजने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये आलापिनी, इंद्रनील यांच्याबरोबरचे तिने दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते तिघे खळखळून हसताना दिसले आहेत. आणखी एक फोटो शेअर करीत वल्लरीने लिहिलेय की, मी माझे काम केल्यामुळे आनंदी आहे. आलापिनी व वल्लरी यांनी रुचा केळकरने टॅग केलेला एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये वल्लरी व आलापिनी यांच्यासह इंद्रनील कामतदेखील दिसत आहे. त्यामुळे हे कलाकार एका नवीन प्रोजेक्टसाठी एकत्र काम करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नुकतीच वल्लरी विराज व आलापिनी निसळने नुकतीच ‘टेली गप्पा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना त्यांच्या आगामी काळातील प्रोजेक्टबद्दल विचारले. त्यावेळी वल्लरी विराज म्हणाली की, काही गोष्टी आहेत. त्या आता सांगता येणार नाहीत. पण, आम्ही लवकरच एकत्र काम करताना दिसू. सध्या छोट्या-मोठ्या गोष्टी सुरू आहेत, असे तिने लिहिले आहे.

इंद्रनील कामत याआधी पिरतीचा वनवा उरी पेटला या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसला होता. तसेच अशोक मा मा या मालिकेतदेखील त्याने छोटीशी भूमिका साकारली होती.

आता हे कलाकार काम करत असलेला प्रोजेक्ट नेमका काय आहे. मालिका, चित्रपट, वेब सीरिज, शॉर्ट फिल्म, गाणे यापैकी कोणत्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.