Yed Lagla Premacha Fame Raya And Manjri : ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील राया आणि मंजिरीची जोडी सध्या घराघरांत लोकप्रिय आहे. यामध्ये ‘बिग बॉस मराठी’ विजेता अभिनेता विशाल निकम आणि लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना आवडतेच पण, विशाल-पूजाचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग देखील तेवढंच छान आहे.

आज पूजाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत विशालने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टसह अभिनेत्याने दोघांचे काही खास फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे राया-मंजिरीचे फोटो मालिकेतील खलनायक इन्सपेक्टर घोरपडे म्हणजेच संग्राम साळवीने काढले आहेत.

विशास निकम पूजा बिरारीला शुभेच्छा देत लिहितो, “Happy Birthday To रायाची मिस फायर आणि विशालची अत्यंत चांगली मैत्रीण. आज आहे ९ ऑगस्ट म्हणजेच तुझा वाढदिवस. मी देवाकडे प्रार्थना करतो की, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत आणि तुला हव्या त्या सगळ्या गोष्टी मिळोत. तुझ्या चेहऱ्यावर छानशी स्माइल कायम ठेव. आज तुझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या आवडीचा फोटो मी शेअर करतोय. कायम सुखात आणि आनंदात राहा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूजा. PS- हुश्श!! केवढं लिहिलं मी आज… इस बात पर पार्टी तो बनता हैं. तुला गिफ्ट काय पाहिजे सांग?”

“मैत्री असावी तर अशी किती छान फोटो आहेत”, “राया आणि मिस फायर किती सुंदर”, “सच्चा दोस्त”, “मस्त जोडीये अशीच मैत्री कायम ठेवा” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी विशाल निकमच्या पोस्टवर दिल्या आहेत.

दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका रात्री १० वाजता प्रसारित केली जाते. विशाल निकमच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर त्याने यापूर्वी ‘साता जन्माच्या गाठी’, ‘दक्खनचा राजा ज्योतिबा’, ‘आई मायेचं कवच’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. मालिकांव्यतिरिक्त त्याने ‘मिथुन’, ‘धुमस’, ‘बलोच’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. विशाल ‘बिग बॉस’ मराठीमध्येही झळकला होता, तो तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता.