Rohit Purohit Sheena Bajaj Welcomes Baby Boy: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता रोहित पुरोहित बाबा झाला आहे. रोहितची पत्नी शीना बजाज हिने मुलाला जन्म दिला आहे. रोहितने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून बाळाच्या जन्माची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली.
रोहित व शीना यांच्या घरी लग्नानंतर सहा वर्षांनी पाळणा हलला आहे. रोहित व शीना यांचं हे पहिलंच बाळ आहे. दोघेही मुलाच्या जन्मामुळे खूपच आनंदी आहेत. रोहितने ही गुड न्यूज शेअर केल्यावर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
रोहितने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहे. पहिल्या फोटोमध्ये It’s a Boy असं लिहिलं आहे. तर दुसरा फोटो रोहित व शीना यांचा आहे. शीना हिने १५ सप्टेंबर रोजी मुलाला जन्म दिला.
पाहा पोस्ट-
रोहित आणि शीनाच्या पोस्टवर चाहत्यांनी व सेलिब्रिटींनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रोहितच्या इंडस्ट्रीतील मित्रांनीही कमेंट करून आनंद व्यक्त केला आहे. रोमित राज पराशर, अनिरुद्ध दवे, मयुर मेहता, समर्थ जुरेलसह अनेक कलाकारांनी रोहित व शीनाचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, रोहित पुरोहित व शीना बजाज यांचे लग्न २२ जानेवारी २०१९ रोजी जयपूरमध्ये झाले होते. खास गोष्ट अशी की रोहितने मे २०२५ मध्ये तो बाबा होणार ही गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत रोहित साकारत असलेले पात्र अरमान बाबा होणार, असा ट्रॅक सुरू होता. त्याचवेळी खऱ्या आयुष्यातही रोहितने बाबा होणार असल्याची बातमी दिली होती.