शिवांगी जोशी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून ती घराघरांत पोहोचली. आपल्या अभियाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर शिवांगी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसते. अभिनयाबरोबर शिवांगी वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. आता शिवांगी आपल्या नव्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.

शिवांगीने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती तिच्या हाताच्या बोटांमधील हिऱ्यांची अंगठी दाखविताना दिसत आहे. हा फोटो शेअर करीत तिने ‘मी हो म्हणाले’, अशी कॅप्शनही दिली आहे. या पोस्टवरून तिने सारखपुडा केला असल्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर तिची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट्स करीत तिच्यावर अभिनंदनांचा वर्षाव केला आहे. तर काहींनी कमेंट्स करीत आश्चर्य व्यक्त केले.

एकाने कमेंट करीत लिहिले, “एका मिनिटासाठी मला वाटले तू साखरपुडा केलास.” तर दुसऱ्याने, “काही सेकंदांसाठी मला छोटा हार्ट अटॅक आला होता”, अशी कमेंट केली आहे. मात्र, शिवांगीच्या बोटातील ही अंगठी साखरपुड्याची नसून, एका दागिन्याच्या कंपनीच्या जाहिरातीसाठी वापरण्यात आली असल्याचे समोर आले आहे. शिवांगीने ही पोस्ट संबंधित दागिन्यांच्या कंपनीला टॅगही केली आहे.

हेही वाचा- अशीच बायको हवी! मन उडू उडू झालं फेम अजिंक्य राऊतने सांगितल्या जोडीदाराबाबतच्या अपेक्षा, म्हणाला “जिच्याबरोबर मला …”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’फेम अभिनेता मोहसीन खानबरोबर शिवांगी रिलेशनशिपमध्ये होती. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मोहसीन व शिवांगीचे ब्रेकअप झाले. आता दोघे आपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. शिवांगीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ते ‘ये प्यार तुने क्या किया’, ‘लव्ह बाय चान्स’, ‘ये है आशिकी’, ‘ये रिश्ते है प्यार के’, ‘खेलती है जिंदगी आँख मिचोली’ यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच तिने बेकाबू या फँटसीवर आधारित असलेल्या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले आहे.