Zee Marathi Savalyachi Janu Savali Serial : छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नेहमीच काही ना काही ट्विस्ट येत असतात. अनेकदा कथानकाच्या गरजेनुसार मालिकांमध्ये नव्या कलाकारांची एन्ट्री होते. तर काहीवेळा कलाकार वैयक्तिक कारणास्तव मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात. अशावेळी रिप्लेसमेंटची भूमिका कोण साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असतं.

‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून नुकतीच एका लोकप्रिय अभिनेत्याने एक्झिट घेतली. हा अभिनेता नेमका कोण आहे आणि त्याच्याजागी आता मालिकेत कोणाची वर्णी लागलीये जाणून घेऊयात…

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सुद्धा या ‘सावळ्याची जणू सावली’ या सिरियलच्या टीमने सर्वोत्कृष्ट मालिकेसह अनेक पुरस्कार जिंकले. या मालिकेत प्राप्ती रेडकर ( सावली ) आणि साईंकीत कामत ( सारंग ) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सारंगच्या भावाची म्हणजेच सोहमची भूमिका या मालिकेत अभिनेता गुरू दिवेकर साकारत होता. मात्र, नुकतीच त्याने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे.

आता ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सोहम मेहेंदळे ही रिप्लेसमेंट भूमिका अभिनेता रुचिर गुरव साकारणार आहे. यापूर्वी रुचिरने ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत काम केलेलं आहे. याशिवाय ‘स्वाभिमान’, ‘शुभ विवाह’ या मालिकांमध्येही तो झळकला आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका सोडल्यावर अभिनेता गुरू दिवेकर म्हणतो, “मला सोहम या भूमिकेसाठी योग्य समजल्याबद्दल, मला ही संधी दिल्याबद्दल मी कोठारे व्हिजन आणि झी मराठीचे मनापासून आभार मानतो. तसेच रुचिरला सुद्धा शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट! टीम सावळ्याची जणू सावली झिंदाबाद!”

guru divekar
मराठी अभिनेत्याची मालिकेतून एक्झि

दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत नवीन सोहम म्हणून एन्ट्री घेणाऱ्या रुचिरवर मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. वल्लरी विराज, शर्मिला शिंदे, सानिका काशीकर, राज मोरे, कुंजिका यांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करत रुचिरचं कौतुक केलं आहे.