Zee Marathi Actress : ‘झी मराठी’ वाहिनीवर सप्टेंबर २०२४ मध्ये ‘सावळ्याची जणू सावली’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि अभिनेता साईंकीत कामत यांनी प्रमुख भूमिका साकारत आहेत. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. सावलीचा साधाभोळा स्वभाव, तिचा सुरेल आवाज, निरागसता या गोष्टी प्रेक्षकांना विशेष भावतात.

मालिकेत सावलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर फक्त २१ वर्षांची आहे. यापूर्वी तिने ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘काव्यांजली’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. प्राप्ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. वैयक्तिक आयुष्यात ती उत्तम डान्सर सुद्धा आहे. प्राप्तीने नुकताच संजू राठोडच्या व्हायरल ‘शेकी’ गाण्यावर केलेला डान्स सर्वत्र चर्चेत आला आहे.

‘गुलाबी साडी’ फेम लोकप्रिय गायक संजू राठोडचं ‘शेकी’ गाणं एप्रिल महिन्यात प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्याने महिन्याभरातच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटींनी सुद्धा ‘एक नंबर, तुझी कंबर… हाय चाल शेकी शेकी हाय’ म्हणत संजूच्या या गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे.

आता ‘सावळ्याची जणू सावली’ फेम सावली म्हणजे प्राप्ती रेडकरला सुद्धा ‘शेकी’ गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसून या ट्रेंडिंग गाण्यावर हटके एक्स्प्रेशन्स देत सुंदर डान्स केला आहे. नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

‘शिवा’ फेम अभिनेत्री पूर्वा कौशिकने या व्हिडीओवर “मेकअप रुम…” अशी कमेंट केली आहे. यावर प्राप्तीने, “शिवाची मेकअप रुम” असं उत्तर दिलं आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या चाहत्यांनी, “झकास”, “आय हाय यहा मैं पिघल गया”, “झकास डान्स यार”, “क्युट सावली” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका दररोज सायंकाळी ७ वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये प्राप्ती आणि साईंकितसह सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, मेघा धाडे, भाग्यश्री दळवी असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.