Zee Marathi Chala Hawa Yeu Dya Show : ‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच ‘चला हवा येऊ द्या’ या शोचा नवीन सीझन सुरू होणार आहे. यंदा या कार्यक्रमाचं स्वरुप काहीसं बदलण्यात आलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरात ऑडिशन्स घेण्यात येत आहेत. आता या शोमध्ये यंदाच्या सीझनला काय-काय ट्विस्ट असणार याचा उलगडा लवकरच प्रेक्षकांसमोर होणार आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं जवळपास १० वर्षे मनोरंजन केलं होतं. यानंतर गेल्यावर्षी या शोने काही महिन्यांसाठी ब्रेक घेतला होता. ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम ऑफ एअर झाल्यावर या शोमधल्या प्रत्येक कलाकाराला चाहते मिस करत होते. आता लवकरच प्रसारित होणाऱ्या नव्या सीझनमध्ये कोणकोणते कलाकार झळकणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. यापैकी तीन कलाकारांची नावं ऑडिशन्स दरम्यान समोर आली आहेत.

कुशल बद्रिके, श्रेया बुगडे आणि भारत गणेशपुरे हे कलाकार ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या नव्या सीझनमध्ये झळकणार आहेत. ऑडिशन दरम्यानच्या पोस्टरवर या तिघांचे फोटो एकत्र झळकल्याने यंदाच्या सीझनमध्ये हे तिघंही सहभाग घेत असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेलं आहे. याशिवाय कुशलने स्वत: पोस्ट शेअर करत त्याच्या एन्ट्रीबद्दल माहिती दिली आहे.

कुशल त्याच्या पत्नीसह नुकताच कोल्हापूरला गेला होता. यावेळी देवीच्या मंदिरात दर्शन घेतल्यावर कुशलने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “तसं हात जोडून देवापुढे काय मागावं मला कळत नाही, पण बऱ्याचदा Thank You म्हणावंसं वाटतं. जे-जे त्याने आयुष्यात दिलंय त्या सगळ्यासाठी… असंच Thank You म्हणायला, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला, माझ्या घरच्या कडकलक्ष्मीबरोबर जाऊन आलो. नव्याने “चला हवा येऊ द्या” सुरू होतंय तुम्हा सगळ्यांचे शुभाशीर्वाद सोबत असूद्या!”असं कुशलने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
chala hawa yeu dya
‘चला हवा येऊ द्या’, शोमध्ये कोण-कोण झळकणार?

कुशल बद्रिकेने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय अभिनेता ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वात झळकणार असल्याने त्याच्या चाहत्यांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आहे.