Zee Marathi Serial : सध्या प्रत्येक वाहिनी टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी नवनवीन प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या ११ ऑगस्टला ‘झी मराठी’ वाहिनीवर दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत. यापैकी ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्य भूमिका साकारत आहे. तर, ‘तारिणी’ मालिकेत शिवानी सोनार प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका ११ ऑगस्टपासून संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे काही जुन्या मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. ११ ऑगस्टपासून वाहिनीवरील एकूण ३ मालिकांच्या वेळेत बदल केला जाईल.
सध्या साडेसात वाजता ‘पारू’ ही मालिका प्रसारित केली जाते. आता ही मालिका अर्धा तास आधी म्हणजेच ७ वाजता प्रसारित केली जाईल. तर, ७ वाजताची ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका आता ६:३० वाजता ऑन एअर होईल. याशिवाय ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेची वेळ बदलून सायंकाळी ६ वाजता ही करण्यात आली आहे.
११ ऑगस्टपासून नव्या वेळेत प्रसारित होणार ‘या’ मालिका
१. लाखात एक आमचा दादा – ६ वाजता
२. सावळ्याची जणू सावली – ६:३० वाजता
३. पारू – ७ वाजता
याशिवाय शिवानी सोनारची ‘तारिणी’ मालिका ९:३० वाजता प्रसारित केली जाईल. या स्लॉटला सध्या सुरू असलेली ‘शिवा’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे. शिवानी सोनारच्या ‘तारिणी’ मालिकेत तिच्यासह अभिज्ञा भावे, स्वराज नागरगोजे, सुवेधा देसाई, आरती वडगबाळकर, नियती राजवाडे, रुपाली मांगले ज्येष्ठ अभिनेत्री रागिणी सामंत असे बरेच कलाकार झळकणार आहेत.
तसेच तेजश्री प्रधानच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे एकत्र झळकणार आहेत. याशिवाय पूर्णिमा डे, राज मोरे, ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्या, किशोरी अंबिये, किशोर महाबोले हे कलाकार सुद्धा या मालिकेत झळकतील.