Devmanus Madhla Adhyay upcoming twist: ‘देवमाणूस’ ही मालिका लोकप्रिय ठरली आहे. सध्या देवमाणूस मधला अध्याय ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. याआधी या मालिकेचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
पैशांच्या हव्यासापोटी एक व्यक्ती नाव बदलून लोकांना फसवून विशेषत: महिलांना फसवून त्यांच्याकडून पैसे, दागिने घेऊन त्यांचे खून करत असल्याचे पाहायला मिळते. या व्यक्तीची देवीसिंग, अजितकुमार आणि आता गोपाळ अशी विविध रुपे आणि नावे आहेत.
देवमाणसाचा अंत जवळ आलाय
संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला जाऊन त्यांच्या नजरेत असं काहीतरी काम करायचं, ज्यामुळे देवीसिंगला लोक देव समजतात, त्याला देवमाणूस म्हणतात. देवीसिंग कोणत्याही रुपात असला तरी त्याची लोकांना फसवण्याची, खून करण्याची, त्यातून अलगद सुटण्याची स्टाइल सारखीच असल्याचे पाहायला मिळते.
गोपाळ म्हणून त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. त्याने दोन खून केले आहेत. पण, त्याबद्दल कोणालाही माहीत नाही. ज्यांना त्याच्यावर संशय येतो, ज्यांना त्याच्याबद्दल माहीत होते, त्यांचे तो खून करतो. आता गावात जामकर नावाची व्यक्ती आली आहे. त्याला गोपाळवर संशय असल्याचे पाहायला मिळते.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर देवमाणूस मधला अध्याय या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की अंधार पडलेला आहे. गोपाळ त्याच्या गाडीवरून कुठेतरी जात आहे. तितक्यात त्याच्या गाडीच्या आडवी एक आजी येते, ते पाहून गोपाळ गाडीला ब्रेक लावतो. तो मोठ्याने म्हणतो, ए म्हातारे मरायचंय का तुला? त्यावर ती आजी त्याला म्हणते, होय. मराचंय. मला नाही, तुला. तो आलाय. असं म्हणत आजी तिथून निघून जाते.
आजीचे बोलणे ऐकूण गोपाळला धक्का बसतो. तो गाडीवरून खाली उतरतो, तर त्याला कशाचातरी आवाज येतो. तोंडावर विचित्र मास्क असलेली एक व्यक्ती गोपाळच्या जवळ येते आणि म्हणते की, अंत जवळ आला आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने ‘देवमाणसाचा अंत जवळ आलाय’, अशी कॅप्शन लिहिली आहे. आता मालिकेत नेमकं काय घडणार, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.