Zee Marathi Serial : गेल्या काही दिवसांत छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये अनेक लोकप्रिय अभिनेत्रींच्या एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळालं. मालिकेचं कथानक आणखी रंजक करुन, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी नेहमीच विविध प्रयत्न केले जातात. काही दिवसांपूर्वीच ‘झी मराठी’च्या ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्तेंची एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता ‘झी मराठी’च्या आणखी एका मालिकेत एक नवीन अभिनेत्री एन्ट्री घेणार आहे.

गेल्यावर्षी जुलै महिन्यात Zee Marathi वाहिनीवर ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका सुरू झाली. यामध्ये अभिनेता नितीश चव्हाण सूर्या दादाची प्रमुख भूमिका साकारत आहे. आपला संसार व्यवस्थित सांभाळून सूर्या दादा आपल्या चारही बहि‍णींची नीट काळजी घेत असल्याचा ट्रॅक सध्या मालिकेत सुरू आहे. सूर्या दादा नेहमीच आपल्या बहि‍णींच्या मदतीसाठी सर्वात आधी धावून जाताना दिसतो. याच दादाच्या घरी आता एक नवीन बाई येणार आहेत. या बाई नेमक्या कोण आहेत पाहूयात…

हेही वाचा : मराठी चित्रपटसृष्टी ऑक्सिजनवर, वर्षभरात एकही चित्रपट चालला नाही; शशांक शेंडे यांचं स्पष्ट मत; म्हणाले, “साऊथ सिनेमांबरोबर तुलना…”

‘झी मराठी’ ( Zee Marathi ) वाहिनीने इन्स्टाग्रामवर याचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये एक बाई सूर्या दादाच्या घराचा दरवाजा ठोठावत असल्याचं पाहायला मिळतंय. तुळजाने दार उघडल्यावर ही बाई थेट घरात शिरते आणि घराचा प्रत्येक कोपरा निरखून पाहू लागते.

“अजूनही जसंच्या तसं घर आहे माझं…हा सोफा, या खोल्या, देवारा सगळं आधीसारखंच आहे.” असं ती बाई या व्हिडीओमध्ये म्हणते. हे पाहून तुळजाला धक्का बसतो. दुसरीकडे, सूर्या त्या बाईंना विचारतो, “तुला इथे कोणी पाठवलं?” त्याच्या चेहऱ्यावरचा राग या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. याशिवाय सूर्याच्या बहिणी या बाईंना पाहून “ही आपली आई तर नाही” अशी चर्चा करु लागतात. आता या बाईंच्या येण्याने मालिकेत कोणता ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हेही वाचा : “माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सूर्या दादाच्या घरी आलेल्या या बाईंची भूमिका अभिनेत्री पुष्पा चौधरी साकारत आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. पुष्पा चौधरींनी यापूर्वी ‘देवमाणूस’ मालिकेमध्ये वंदी आत्याची भूमिका साकारली होती. तर ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील ( Zee Marathi ) त्यांनी साकारलेल्या मनी मावशी पात्राचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं होतं.