Zee Marathi Actress Isha Sanjay : अलीकडच्या काळात सगळे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेऊन, ‘लाइव्ह’ येऊन हे सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांशी गप्पा मारतात. ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री ईशा संजयने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेत आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं.

‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका गेल्यावर्षी जुलै महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये अभिनेता नितीश चव्हाण मुख्य भूमिकेत आहे. तर, त्याच्या चार बहि‍णींपैकी राजश्रीची भूमिका अभिनेत्री ईशा संजय साकारत आहे. तिला मालिकेत प्रेमाने सगळे राजू म्हणत असतात.

ईशाने ‘आस्क मी सेशन’मध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा करत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ईशा ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा मुलगा अमेय नारकरला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. आता ईशाने त्याच्याबरोबरचा फोटो शेअर करत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. ईशाला नेटकऱ्याने, “तुझं लग्न झालंय का दीदी?” असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलेलं उत्तर वाचून दोघंही लाँग डिस्टंस रिलेशनशिपमध्ये आहेत हे स्पष्ट होत आहे.

अमेय नारकरबरोबरचा फोटो शेअर करत ईशाने नेटकऱ्याला, “लग्न नाही झालंय कारण, कोणीतरी खूप दूर आहे सध्या” असं उत्तर दिलं आहे. याशिवाय या पोस्टमध्ये ईशाने अमेयला टॅग सुद्धा केलं आहे. यावरून दोघंही एकमेकांना डेट करत असून, लग्न करण्याच्या विचारात आहेत असं स्पष्ट होत आहे. सध्या अमेय परदेशात उच्चशिक्षण घेत आहे. त्यालाही इंडस्ट्रीत करिअर करायचं आहे. असं ऐश्वर्या यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Zee Marathi
लाखात एक आमचा दादा फेम अभिनेत्री ईशा संजयची पोस्ट

दरम्यान, अमेय आणि ईशा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचे एकत्र अनेक फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय ईशा, ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या अनेक व्हिडीओवर कमेंट्स देखील करत असते.

View this post on Instagram

A post shared by I S H A (@ishaasanjay)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यंतरी ईशा संजय आणि अमेयचा एकत्र डान्स करताना व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता. या दोघांच्या एनर्जेटिक डान्सचं सर्वांनीच कौतुक केलं होतं.