Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या हरिशने नवीन व्यवसाय सुरू केल्याचा सीक्वेन्स चालू आहे. घरातील सगळी मुलं आता हळुहळू मार्गाला लागली आहेत. आता फक्त भावनाचं लग्न होणं बाकी आहे या विचाराने लक्ष्मी काहिशी समाधानी असते. धाकटी लेक जान्हवी सुद्धा सासरी सुखाचा संसार करत असल्याचा समज दळवी कुटुंबीयांचा असतो. मात्र, हळुहळू जयंतचं विकृत रुप पुन्हा एकदा जान्हवीसमोर येऊ लागलं आहे.

जयंतला जान्हवीने तिच्या वेंकी दादाशी बोललेलं आवडत नाही, तिने तिच्या कॉलेजच्या मित्राशी हात मिळवणं त्याला खटकतं. या सगळ्या गोष्टींचा जयंत मनातल्या मनात राग-राग करत असतो. पण, आता मालिकेत असं काहीतरी होणार आहे ज्यानंतर जयंत थेट जान्हवीला शिक्षा देणार आहे.

जयंत आणि जान्हवी एका पार्टीला गेलेले असतात. यावेळी ‘बेस्ट कपल’ म्हणून दोघंही एकत्र केक कापतात. उपस्थितांच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमात जान्हवी गाणं गाते. आपल्या बायकोने सर्वांसमोर गाणं बोलू नये अशी जयंतची इच्छा असते. पण, सर्वांच्या आग्रहाखातर जान्हवी आपलं गाणं सादर करते. जान्हवीचा सुरेल आवाज ऐकून सगळेजण तिचं कौतुक करत असतात. हे दृश्य पाहून विकृत जयंत त्याच्या हातातील ग्लास फोडतो. दोघंही घरी येतात आणि त्यानंतर जयंत शिक्षा म्हणून जान्हवीला पुन्हा एकदा गाणं गायला सांगतो. “वन्समोअर आता पुन्हा एकदा गा…” असं म्हणत जयंत तिला वारंवार गाणं गायला सांगतो.

गाणं गाताना थकलेल्या जान्हवीला खूप झोप येत असते. ती प्रचंड थकली असल्याचं जयंतला सांगते. यावर तो म्हणतो, “पार्टीमध्ये सगळ्यांनी आग्रह केल्यावर गायलीसच ना?” पुढे, जान्हवी काहीच न बोलता गाणं गायला सुरुवात करते. प्रचंड झोप येत असूनही ती गाते, शेवटी रात्रभर गाणं गायल्यावर थकून तिचा डोळा लागतो आणि ती सोफ्यावर आडवी पडते.

दुसऱ्या दिवशी, सकाळी लक्ष्मी जान्हवीला विचारपूस करण्यासाठी फोन करते. तेव्हा जान्हवीचा आवाज काहीसा अडखळतोय, नीट येत नाही हे लक्ष्मीला जाणवतं. रात्रभर गाणं गाऊन तिचा घसा दुखत असतो. आता जान्हवी नेमकं काय घडलंय हे आपल्या आईला सांगणार का? जयंतचं सत्य जान्हवी आपल्या कुटुंबीयांसमोर केव्हा आणणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Lakshmi Niwas
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, या प्रोमोवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “जान्हवी काही झालं तरी, एवढ्या लवकर आपल्या आईला काहीच नाही सांगणार”, “जान्हवी नाही सांगणार कारण ती जयंतपेक्षा वेड्यासारखी वागतेय”, “या जयंतचा भूतकाळ जाणून घेण्याची इच्छा आहे”, “अरे हे किती वाईट आहे”, “मालिकेची वाट लावताय”, “दुसऱ्या मालिका का कॉपी करता, मराठी प्रेक्षकांची मानसिकता अशी नाहीये फार वेगळी आहे त्यामुळे ही विकृती दाखवून नका” अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.