Zee Marathi Laxmi Niwas Serial Promo : छोट्या पडद्यावर येत्या काही दिवसांमध्ये नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीने त्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये नव्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेची घोषणा करून पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. या पहिल्या प्रोमोतून मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांची जोडी प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र, ही कौटुंबिक मालिका असल्याने यासाठी मालिकाविश्व गाजवणारे आणखी काही दमदार कलाकार एकत्र येणार आहेत.

अभिनेत्री अक्षया देवधर या मालिकेच्या निमित्ताने ‘झी मराठी’वर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत हर्षदा खानविलकर ‘लक्ष्मी’ तर, तुषार दळवी ‘श्रीनिवास’ यांची प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या दोघांच्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री अक्षया देवधर झळकणार आहे. तिच्याबरोबर या मालिकेत कुणाल शुक्ला महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चौघांनी पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावत आपल्या भूमिकांची माहिती प्रेक्षकांना दिली होती. मात्र, पहिल्याच प्रोमोमध्ये एक फॅमिली फोटो नजरेस पडला होता आणि याच फोटोवरून यामध्ये आणखी अनेक कलाकार झळकणार असल्याचं समोर आलं होतं. आता मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट जाणून घेऊयात…

हेही वाचा : ‘चलो लंडन’ म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ निघाली विदेशात; प्रसाद खांडेकरने शेअर केला एअरपोर्टवरचा खास फोटो

मालिकेत झळकणार ‘हे’ कलाकार

मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोत श्रीनिवास यांना नवीन घर बांधून पूर्ण झाल्यावर त्यात लेकीचं लग्न थाटामाटात पार पडल्याचं स्वप्न पडतं. यामध्ये मालिकेत कोण-कोण झळकणार याची झलक पाहायला मिळत आहे. ‘मुलगी झाली हो’, ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री दिव्या पुगावकर ( Divya Pugaonkar ) ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत झळकणार आहे. याशिवाय ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री मीनाक्षी राठोड, ‘सुख कळले’ फेम स्वाती देवल आणि अभिनेता अनुज ठाकरे अशा दमदार कलाकारांच्या मालिकेत ( Zee Marathi ) महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.

हेही वाचा : करिअरच्या शिखरावर असताना डॉ. श्रीराम नेनेंशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला? माधुरी दीक्षित म्हणाली…

हेही वाचा : “पाच वर्ष सुरू असलेला हा प्रवास…”; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली, “लॉकडाऊनमध्ये…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Zee Marathi Laxmi Niwas Serial Promo
‘झी मराठी’ची नवीन मालिका ‘लक्ष्मी निवास’ ( Zee Marathi Laxmi Niwas Serial Promo )

दरम्यान, ‘झी मराठी’ची ( Zee Marathi ) ही नवीन मालिका मूळ ‘झी तमिळ’वरील ‘थवामई थवामिरुंधू’ आणि ‘झी कन्नड’ची टीआरपी टॉपर असणारी ‘लक्ष्मी निवासा’ मालिकेची रिमेक असणार आहे. आता ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला नेमकी केव्हा येणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, ‘झी मराठी’ वाहिनीकडून लवकरच या मालिकेची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात येणार आहे.