टेलिव्हिजन वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी नेहमीच चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळतं. लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीवर दोन नवीन मालिका सुरू होणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात ‘झी मराठी’वर ‘पारु’ आणि ‘शिवा’ या दोन मालिका लॉन्च करण्यात आल्या. आता या महिन्यात आणखी दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

‘झी मराठी’च्या या दोन नवीन मालिका कोणत्या वेळेला सुरू होणार? याबद्दल गेले अनेक दिवस सोशल मीडियावर चर्चा चालू होती. अखेर वाहिनीने शेअर केलेल्या दोन नवीन प्रोमोजमध्ये प्रेक्षकांना तारीख आणि वेळ दोन्ही सांगण्यात आलं आहे. यापैकी शर्मिष्ठा राऊत व तेजस देसाई यांची निर्मिती असलेली ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोज रात्री १० वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. यामध्ये राकेश बापट, वल्लरी विराज, शर्मिला शिंदे, भुमिजा पाटील, सानिका काशीकर यांच्या महत्त्वाच्या भूमिता आहेत.

हेही वाचा : जान्हवी कपूर बॉयफ्रेंड अन् ओरीसह तिरुपतीच्या दर्शनाला, शिखर पहारियाचं महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

‘झी मराठी’ वाहिनीवर १८ मार्चपासून ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही आणखी एक मालिका सुरू होणार आहे. रोज रात्री ९.३० वाजता ही मालिका प्रसारित केली जाईल. यामध्ये अक्षय म्हात्रे व अक्षया हिंदळकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. सध्या या दोन्ही प्रोमोजला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा : बायोपिकसाठी कोणत्या अभिनेत्याची निवड करणार? अजित पवारांनी सांगितलं नाव, म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका हिंदीमधील ‘पुनर्विवाह’ मालिकेचा रिमेक आहे. तसेच ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका ‘गुड्डन तुमसे ना हो पायेगा’ या मालिकेचा रिमेक करण्यात आल्याची माहिती मराठी टीव्ही इन्फो या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आली आहे. आता या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.